kinwat today news
पोलिसांनी-लढवली-नामी-शक्कल-अन्-कोरोना-बाधितांच्या-संपर्कातील-लोकांना-शोधणे-झाले-सोपे…

पोलिसांनी लढवली नामी शक्कल अन् कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांना शोधणे झाले सोपे…

रायबाग (बेळगाव) – तालुक्यातील कुडची येथे कोरोनाने थैमान घातले आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे या लोकांना त्वरित शोधण्यासह बंदोबस्तात निटनेटकेपणा येण्यासाठी कुडची येथे नामी शक्कल लढविण्यात आली आहे. त्यासाठी येथे या आधी काम केलेल्या पोलिसांना ड्युटीवर बोलावले आहे.

 

कुडची हे शहर कोरोनामुळे धास्तावले आहे. निगेटिव्ह  अहवाल आलेल्यांचे पॉझिटिव्ह अहवाल आल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे बाधित लोकांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून तातडीने अलगीकरण करणे गरजेचे आहे. त्यात नवीन पोलिस ड्युटीवर दिल्यास पत्ता शोधताना अडचणी येऊन कामास विलंब होऊ शकतो. शहराची संपूर्ण माहिती असल्यास बंदोबस्तातही कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळेच या आधी काम केलेल्या पोलिसांना ड्युटी दिल्याने कामे वेगाने होण्याची संधी साधण्यात आली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांची भेट घेऊन दिवसभरातील कामाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला जात आहे.

 

वाचा – आता बेळगावात या ठिकाणी होणार कोरोनाची तपासणी…

कुडचीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्याचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे विविध खात्यातील वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. गुरुवारी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कमल पंत यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश व कुडचीचे उपनिरीक्षक शिवराज दरीगौड चोख सेवा बजावत आहेत.

पोलिसांचे महत्व अधोरेखित

कोरोनाला रोखण्यात पोलिस खात्याकडून चांगलेच सहकार्य मिळत आहे. लॉकडाउन, सीलडाउन, बंदोबस्त, आरोग्य सर्वेक्षण यासह विविध कामांना हातभार लागत आहे. त्यामुळे त्यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

‘कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी कुडचीत सीलडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधून त्वरित उपाययोजना करणे आवश्यक असल्याने या आधी काम केलेल्या पोलिसांची मदत होत आहे. आपण देखील येथे काम केल्याने जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालयातून ड्युटीवर आलो आहोत.’
जी. एस. उप्पार,
पोलिस उपनिरीक्षक

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply