kinwat today news
सुपरस्टार-महेशबाबू-झाला-टेनिसपटू

सुपरस्टार महेशबाबू झाला टेनिसपटू

तेलगु सुपरस्टार महेश बाबूने काही दिवसांपूर्वी सफाई कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियावर आभार व्यक्त केले होते. या महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सफाई कर्मचारी आपली सुरक्षा करत आहेत. त्याचे आभार अशा आशयाचा मेसेज त्याने लिहिला होता. आता सेल्फ आयसोलेशनमध्ये तो आपला जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवत आहे. नुकताच मुलासोबत व्हिडिओ गेम खेळतानाचा एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला. हातात कोणतंही काम घेतलं की ते उत्तमप्रकारे पूर्ण करायचं अशी महेशबाबूची ओळख आहे. त्यामुळे आता भविष्यात तो उत्तम टेनिसपटू झाला तर त्याच्या चाहत्यांना आश्चर्य वाटणार नाही.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply