kinwat today news
आदिवासींना-मरीआई-वाचवणार-कोरोनापासून…

आदिवासींना मरीआई वाचवणार कोरोनापासून…

अकोले: साथीचे रोग कोण घालवित असेल तर ती मरीआई. ग्रामीण भागात मरीआईला पूजणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मरीआईला नवससायास केले की रोग पळतो, अशी त्यांची धारणा असते. अकोल्याच्या आदिवासी भागातही सध्या तेच सुरू आहे. कोरोना महामारीपासून देश आणि मानव जमात वाचावी यासाठी मरीआईला नवस केला जात आहे.

“मरीआई दार उघड आता दार उघड “… म्हणत कोहंडी ग्रामस्थांनी व महिलांनी तोंडाला रुमाल बांधून  मरीआईला साकडे घातले. गावात महामारी कोरोनाचे संकट येऊ नये म्हणून गावाबाहेर असलेल्या मरीआईच्या देवळात जाऊन महिलांनी डोक्यावर हंडे नेऊन मरीआईला अभिषेक घातला. उपवास केला तर आपल्या सर्व मुला-बाळांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायला लावून देवीचा अंगारा लावला. कोरोनाचे संकट दूर कर माझे आई तुझा नवस फेडील व देवी आय तुझी यात्राही करील, असे म्हणत जयघोष केला.

हेही वाचा – रविना टंडन, फराह खानविरूद्ध गुन्हा दाखल

येथील नागरिकांनी गावात सभेचे आयोजन करून सर्वांनुमते यावर उपाय म्हणून गावाची रक्षण करती मरीआई मातेला सर्वांच्या वतीने साकडे घालून पाच मंगळवार कोणी कोणतेही कामे तसेच दोन हांड्याने पाणी आणू नये. प्रत्येक घरातील एका महिलेने मंगळवार उपवास करणे, हा दैवी नियम पाळून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखाण्यासाठी देवीला विनंती करण्यात आली. देवीची उपासणा केल्याने कोरोना काहीच करणार नाही, असा त्यांना विश्वास आहे.

आदिवासी भागात वैद्यकीय क्षेत्राविषयी माहिती नाही. त्यामुळे ते आपली परंपरा व नियम पाळतात. कोरोनाबाबतही ते असेच करीत आहेत. दुसरीकडे मुंबई , पुणे , नाशिक इतर शहरातील आलेल्या नागरीकांना गावात तपासणी करून प्रवेश दिला जातो. सरपंच आत्माराम तातळे, उपसरपंच बाळु हिंदोळे, तंटामुक्ती अध्यक्ष गोरख परते तसेच कोहोंडी व ठाकरवाडी येथील तरुण मित्रमंडळ, महिला मंडळ तसेच सर्व ग्रामस्थांचे सहकार्य आहे.

‘जसा भाव, तसा देव’ या म्हणीप्रमाणे गावात स्थिरावलेल्या माणसाची दैवतंही गावाच्या वेशीबाहेर खुंटी ठोकून बसविलेली आहेत. कुटुंबकाबिल्यासह मरीआईचा सांगावा घेऊन भटकणाऱ्या पोतराजाच्या डोईवर मात्र मरीआईचा फिरता देव्हारा असतो.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply