kinwat today news
लॉकडाउन-:-वेळेवर-मिळाले-नाही-वाहन-अन्-तिने-शेतामध्येच-दिला-एका-गोंडस-बाळाला-जन्म

लॉकडाउन : वेळेवर मिळाले नाही वाहन अन् तिने शेतामध्येच दिला एका गोंडस बाळाला जन्म

तरोडा (जि. अकोला) : गेली 25 दिवसापासून हाताला काम नसल्याने अनेक मजुरांचे खाण्याचे वांदे होत आहेत. तरोडा सह कावसा, दनोरी, पनोरी, मरोडा, कुटासा, दिनोडा या भागात मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेशातील मजूर कामासाठी आला आहेत. परंतु, लॉकडाउनमधे त्यांना आपल्या गावी परत जाता आले नाही. त्यामुळे गंभीर परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागत आहे. कावसा गावालगच गौरव दामोधर यांच्या शेतात मध्यप्रदेशातील कुटुंब वास्तव्यास आहे. सुनिता रमेश सावरकार रा. गोंदरी जिल्हा बुरहानपूर या गरोदर महिलेला वेळेवर दवाखान्यात जाण्यासाठी वाहन न मिळाल्याने शेतामध्येच एका गोंडस बाळाला जन्म दिला. परंतु, गावातील काही महिलांनी तिची मदत केल्याने जच्चा आणि बच्चा दोघेही सुखरुप आहेत.

हेही वाचा- राज्यातील गणित शिक्षकांचा विद्यार्थ्यांसाठी ‘सेतू’

गावातील महिलांनी केले सहकार्य
गुरुवारी (ता.16) सायंकाळी तीन वाजता महिचे पोट दुखत होते. जास्त त्रास होत असल्याने तिच्या पतिने गौरव दामोधर यांना फोन करून माहिती दिली आणि एखाद्या वाहनाची व्यवस्था करण्याची विनंती केली. दामोदर यांनी रुग्णवाहीनीला फोन करून बोलावण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशभर ३ मे पर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालक कारवाईच्या भीती पोटी वाहन घेऊन येण्यास तयार नव्हते.

कसेबसे गावातील एक खासगी प्रवासी वाहन मिळाले. परंतु, तोपर्यंत खुप वेळ झाली होती. आणि गरोदर महिलेने शेतातच एका गोंडस बाळाला जन्म दिला. गावातील काही महिलांना ही माहिती मिळताच त्यांनी शेतात धाव घेऊन महिला व बाळाची मदत केली. महिलेला ऑटोने कावसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आनले. डॉक्टरांनी महिला व बाळाची तपासणी केली असता बाळाची व आई ठीक असल्याची माहिती दिली. त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आले. प्रसुतीसाठी गावातील महिला व इतर नागरिकांनी केलेल्या मदती बद्दल बाळाच्या पित्याने सर्वांचे आभार मानले.

क्लिक करा- कोरोनाची नियमावली पाडून आमदार पुत्र आणि कन्येचा विवाह सोहळा साधेपणात

गावकऱ्यांचे मनापासून आभार
गावकऱ्यांनी मला खुप मदत केली. लवकरच गाडी बोलाऊन माझ्या पत्नीला दवाखान्यात दाखल केले. सध्या बाळाची व आईची तबेत चागंली आहे. गावकऱ्यांचे मनापासून आभारी आहे.
-रमेश सावकार, जन्मलेल्या बाळाचे वडील

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply