kinwat today news
#lockdown2.0-:-तंबाखू,-गुटखा-शौकिनांचं-मस्त-चाललंय

#Lockdown2.0 : तंबाखू, गुटखा शौकिनांचं मस्त चाललंय

लॉकडाउनमध्येही भागतेय तलफ; शहरात चौपट-पाचपट दराने विक्री 
पिंपरी – ‘तंबाखूची पुडी हवीय’’, ‘‘हो भेटेल ना’’, ‘‘कितीला आहे?’’, ‘‘पन्नास रुपये.’’ हा संवाद आहे, तंबाखू विक्रेत्यासोबतचा. सध्या केवळ जीवनावश्‍यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी आहे. मात्र, शहरात सर्रासपणे चौपट-पाचपट दराने तंबाखू आणि गुटख्याची विक्री होत असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये उघड झाले. दुकानांमधून विकता येत नसल्याने फोनवरून वैयक्तिकरित्या भेट घेत किंवा घरातून विक्री केली जात असल्याचे समोर आले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारतर्फे विविध प्रयत्न केले जात आहेत. तरीही अनेक ठिकाणी तंबाखू, गुटखा व मद्याची बेकायदेशीर विक्री सुरूच आहे. काही ठिकाणी जीवनावश्‍यक वस्तू भेटणार नाही, पण तंबाखू, गुटखा उपलब्ध होईल, अशी स्थिती आहे. किराणामालाच्या दुकानांतून किंवा घरातून हा माल विकला जात आहे. संबंधित विक्रेता फोनवरून ऑर्डर घेत दहा रुपये किंमत असलेली तंबाखूची पुडी चाळीस रुपयांपासून ऐंशी रुपयांपर्यंत विकत आहेत. 

पहिला प्रसंग… 
अजंठानगर-चिंचवड , वेळ – दुपारी १२.१० 

प्रतिनिधी : तंबाखू कुठे मिळेल? 
विक्रेता : आहे ना, माझ्याकडे पन्नास रुपयाला. 
प्रतिनिधी : दोन पुड्या हव्या होत्या. 
विक्रेता : नाही नाही एकच मिळेल, घ्यायची तर घ्या. 
प्रतिनिधी : बरं द्या. 
विक्रेता : खिशातल्या मोबाईलचा कॅमेरा सुरू नाही ना. 
प्रतिनिधी : छे छे, नाही हो. 
विक्रेता : या आतमध्ये घरात. 

दुसरा प्रसंग… 
लालटोपीनगर-पिंपरी, वेळ – दुपारी १.०० 

प्रतिनिधी : तंबाखूची पुडी हवीय. 
विक्रेता : मिळेल, गाडी लावून आतमध्ये या. 
प्रतिनिधी : कितीला आहे? 
विक्रेता : शंभरच्या तीन येतील. 
प्रतिनिधी : ठिक आहे, द्या. 

तिसरा प्रसंग… 
कासारवाडीमध्ये घरालगत असलेले एक पान सेंटर बंद आहे. तरीही घरून दरवाजाच्या फटीतून तंबाखूची विक्री केली जात आहे. ज्यांना माहिती आहे, ते येथे येतात. केवळ आवाज दिला, तरी झटकन पुडी दिली जाते. तब्बल पन्नास ते ऐंशी रुपये दर एका पुडीसाठी आकारला जात असल्याचे गुरुवारी (ता. १६) सकाळी साडेदहाच्या सुमारास केलेल्या पाहणीत दिसून आले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply