kinwat today news
एवढ्या-लॉकडाऊनमध्ये-कोणी-घोडा-चोरला-रे-?,-ही-बातमी-वाचाच

एवढ्या लॉकडाऊनमध्ये कोणी घोडा चोरला रे ?, ही बातमी वाचाच

नागपूर : संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे, कोणालाही घराबाहेर पडता येत नाही. रस्यावर चिटपाखरू देखील दिसत नाही, वाहनांचे तर विचारूच नका. अशा परिस्थितीत नागपुरातील एका चोराला बहुदा घोडेस्वारीची हौस करावीशी वाटली असेल. यासाठी पठ्ठ्याने काय केले ते वाचून तुम्हाला नक्की हसू येईल.

रामदेवबाबा टेकडी मंदिरसमोरील रहिवासी सोमचंद्र जेठमल छंगानी (60) यांच्याकडे सुमारे सव्वालाख रुपये किमतीचा पांढऱ्या-काळ्या रंगाचा घोडा होता. त्यांनी घोडा घरासमोरील जागेत बांधून ठेवला होता. शनिवारी दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दोर तोडून चोरून नेला.

याप्रकरणी गिट्‌टीखदान पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करीत घोडा व चोरट्याचा शोध सुरू केला आहे. देशभरात लॉकडाऊन असल्याने घरातील वाहन घेऊन बाहेर पडणेही कठीण असताना चक्क घोडाच चोरीला गेल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या पोलिसांनी या घोडाचोराचा शोध सुरू केला आहे. 

– मला माझी आई हवी आहे…दहा वर्षाच्या मुलाचा आईसाठी टाहो!

महिलेसह दोघांचा मृत्यू 
शहरातील वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. हुडकेश्वर हद्यीत डॉ. बंग दवाखान्याजवळील बेसमेंन्टमध्ये गुरुवारी सकाळी एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला. मृताची ओळख पटू शकली नाही. हुडकेश्वर हद्यीतीलच न्यू किर्तीनगर येथील रहिवासी कल्पना सुरेश उरकडे (48) यांची प्रकृती गुरुवारी दुपारी अचानक खालावली. त्यांना उपचारासाठी म्हाळगीनगरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथून मेडिकलमध्ये हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही प्रकरणांमध्ये हुडकेश्‍वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे. 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply