kinwat today news
उन्हाचा-तडाखा;-विदर्भात-या-जिल्ह्यात-सर्वाधिक-तापमानाची-नोंद

उन्हाचा तडाखा; विदर्भात या जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

अकोला : शहरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे शांतता पसरली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाबरोबर शहरात उन्हाचा कडाका देखील चांगलाच वाढू लागला आहे. हॉटसिटी म्हणून ओळख असलेल्या अकोला शहराचे तापमान 43.9 अंशांवर पोहोचले आहे. हे तापमान विदर्भात सर्वाधिक असल्याची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात शहर व ग्रामीण भागात काही ठिकाणी पाऊस झाला होता. मात्र, त्याला म्हणाला तसा जोर नव्हता. त्यामुळे उष्म्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या तापमानात वाढ झाली असून, गुरुवारी शहराचा पारा 43.9 अंशांच्या पुढे पोहोचला होता. अकोला शहरात विदर्भात सर्वाधिक तापमान असल्याची नोंद नागपूर वेधशाळेत झाली आहे. कोरोनामुळे जनता संकटात सापडली आहे. 

महत्त्वाची बातमी – बुलडाणेकरांना गुड न्यूज; तीन पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त

उन्हाळ्याच्या तोंडावरच देशात कोरोनाने प्रवेश केल्याने जनतेला वाढत्या उष्म्याबरोबर कोरोनाशी सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे उन्हापासून थंडावा देणारी रसवंतीगृहे, शीतपेयगृहे बंद असल्याने अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांची गैरसोय होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस, डॉक्टर, नर्स, अंगणवाडी शिक्षिका व आशा कार्यकर्त्या भर उन्हात सेवा बजावत आहेत. मात्र, बाजारपेठेसह इतर मार्गावर शरीरातील दाहकता कमी करणारी शीतपेये व इतर पदार्थ उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.

आवश्‍यक वाचा – बाळा मी लवकरच येईल…

लॉकडाउनमुळे शितपेयही मिळेना
उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अननस, मोसंबी, टरबूज, कोकम सरबत, लिंबू पाणी, उसाचा रस, आईस्कीम, ज्युस यासारख्या शीतपेयांकडे नागरिकांचा कल वाढलेला असतो. मात्र, सध्या कोरोनामुळे हे सर्व बंद असल्याने बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची शीतपेयाविना गैरसोय होत आहे. एकूणच उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply