kinwat today news
सोलापूर-जिल्ह्यात-22-ठिकाणी-"शेतमाला'साठी-पर्यायी-व्यवस्था 

सोलापूर जिल्ह्यात 22 ठिकाणी "शेतमाला'साठी पर्यायी व्यवस्था 

सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना भाजीपाल्यासह इतर शेतमाल विक्री करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. कोरोना रोखण्यासाठी शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांचे पालन करत असतानाच शेतकऱ्यांना बाजारपेठ व ग्राहकांना योग्य किमतीत शेतमाल उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सहकार विभाग व बाजार समित्यांनी पर्यायी व्यवस्था निर्माण करून दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांच्या माध्यमातून 22 ठिकाणी शेतमाल विक्री करण्यासाठी नवीन ठिकाण कार्यान्वित करण्यात आले आहेत. 

हेही वाचा – कोरोनाच्या संकटात पंढरपुरातील महिलांना मिळाला आर्थिक आधार 

जिल्ह्यातील बार्शी व सांगोला बाजार समितीने शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना हातगाडीद्वारे घरोघरी शेतमाल विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे लिलावाच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीवर आळा बसला आहे. अकलूज व कुर्डुवाडी बाजार समितीने प्रत्येकी पाच, मोहोळ समितीने चार, पंढरपूर एक व सोलापूर बाजार समितीने सात अशा 22 ठिकाणी शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. या 22 ठिकाणी दररोज साधारणतः एक हजार ते दीड हजार शेतकरी त्यांचा शेतमाल घेऊन विक्रीसाठी उपस्थित राहत आहेत. 

हेही वाचा – काम कसे करू…राजीनामाच घ्या… 

या 22 ठिकाणी दोन ते अडीच हजार क्विंटल शेतमाल उपलब्ध होऊ लागला आहे. सोलापूर शहर व परिसरातील शेतकऱ्यांसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने सोलापूर शहरात सात ठिकाणी शेतमाल विक्रीची व्यवस्था करून दिली आहे. या ठिकाणी शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास त्या अडचणी सोडवण्यासाठी बाजार समितीच्या वतीने हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. 0217-2374678 ही हेल्पलाइन कार्यान्वित झाली असून शेतकऱ्यांनी या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply