किनवट शहरात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्यावर गेट बसविण्यात आले.

किनवट टुडे न्युज: किनवट शहरात दरवर्षी उन्हाळा लागला की मार्च पासून पाण्याची टंचाई सुरू होते त्यामुळे पाणी अडवा आणि पाणी जिरवा या विचारातून रामनगर येथील कोल्हापुरी बंधारा तसेच पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यावर गेट लावण्यात आले

त्यामुळेच आज आठ ते दहा फूट उंच पाणी जमा झाले आहे. आज किनवट शहरातील वाटर लेवल नकीच वाढण्यास मदत झाली. त्यामुळे किनवटकरांना त्याचा निश्चितच उन्हाळ्यामध्ये फायदा होणार आहे. आणि याचे नियोजन योग्य प्रकारे झाले याचे निश्चितच मनाला समाधान वाटत आहे असे किनवट चे उपनगराध्यक्ष अजय चाडावार यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ सांगितले. या वेळी स्थळाची पाहणी करताना नगराध्यक्ष आनंद मछेवार, उपनगराध्यक्ष अजय चाडावार, नगरपरिषद कर्मचारी अल्ताफ भाई माजी पं.स. सदस्य भाऊराव राठोड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.