kinwat today news

लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना मास्क , रूमालचा वापर करणे बंधनकारक -सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल

किनवट / तालुका प्रतिनिधी :
कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकामी संपूर्ण देशात शासनाने लॉकडाऊन कालावधीस मुदतवाढ दिल्याने उपविभागातील सर्व नागरिकांना मास्क , रूमालचा वापर करणे बंधनकारक केले असल्याचा आदेश सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिला आहे.
जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी यांना Incident Commander व सर्व तहसिलदार यांना Assistant Incident Commander म्हणून जिल्हाधिकारी यांनी घोषित केले आहे. या अधिकाराचा वापर करून किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अभिनव गोयल (भाप्रसे) यांनी विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उपविभागातील किनवट व माहूर तालुक्यातील सर्व नागरिकांना मास्क तसेच हातरुमाल वापरण्यासाठी सक्तीचा आदेश दिला असून जी व्यक्ती विना मास्क वा सुती हात रूमाल चेहऱ्यासह नाक व तोंडावर व्यवस्थितीपणे वापर करणार नाही त्यांचे विरुध्द भारतिय दंडसहितेचे कलम १८८ नुसार कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.
आदेशात असे नमूद केले की, सर्व नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरतांना ( उदा . रस्ते , वाहने , दवाखाने , कार्यालये , बाजार , किराणा दुकान ई. ) तीन पदरी मास्क किंवा साधा सुती कापड़ी रुमाल किंवा कापडाने नाक व तोड झाकुन वापरणे बंधनकारक करण्यात येत आहे . यासाठी वापरण्यात येणारे मास्क हे प्रमाणित असलेल्या कोणत्याही औषध दुकानात मिळणारे किंवा घरगुती तयार करण्यात आलेले कापडाचे , रूमालाचे धुण्यायोग्य असावेत तसचे त्याचा पुनर्वापर करतांना स्वच्छ धुवून निर्जंतुकीकरण करून वापरावेत . असे मास्क प्रत्येकाचे स्वतंत्र असोवत व एकमेकांमध्ये हस्तांतरित करु नयेत. वापर झालेले सर्व टाकाऊ मास्क ( Dispossal Mask ) इतरत्र न टाकता त्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावावी. कोणत्याही नागरिकांनी किंवा शासकीय / निमशासकीय / खाजगी कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वतःच्या अथवा कार्यालयाच्या वाहनातुन आपल्या कार्यक्षेत्रात किंवा कार्यालय परिसरात प्रवास करतांना , काम करतांना बैठकीचे वेळी किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी दोन व्यक्तींनी एकत्र येतांना सुरक्षीत अंतर ठेवून मास्क वापरणे बंधनकारक आहे. सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना शासकीय अधिकारी व इतर सर्व विभागातील अधिकारी अधिकारी कर्मचारी यांनी वरील सूचनांच्याबरोबर बैठकीसाठी अथवा इतर कोणत्याही कायदेशीर कारणांसाठी एकत्र येतांना परस्परात वैद्यकीयदृष्ट्या निर्धारीत केलेले सामाजिक अंतरचा ( Social Distancing ) निकष पाळणे बंधनकारक आहे. सदर कामी दिरंगाई केल्याचे आढळून आल्यास त्यांचेविरुष्ट आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ११ , ५३ व , महाराष्ट्र कोविड – १९ उपाययोजना नियम २०२० मधील कलम तरतुदी व भारतिय दंडसहितेचे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे त्यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply