वनविभागामार्फत होणारी वनांची साफतोड पध्दत बंद करून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा; वनप्रेमी शिवसैनिक नारायण कटकमवार यांचे वनमंत्री संजय राठोड यांना निवेदन

किनवट/ प्रतिनिधीः वनविभागामार्फत होत असलेली शासनमान्य वनांची साफतोड पध्दत बंद करून पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबविण्यात यावा या मागणीचे निवेदन शिवसैनिक तथा माजी वनाधिकारी नारायण कटकमवार यांनी वनमंत्री संजय राठोड यांना दिले आहे.
निवेदनात असे नमूद केले की , महाराष्ट्रात वनविभाग वनविकास महामंडळाकडून जकास सं . मान्यतेनुसार वनाची साफतोड ( ओव्हर वुड रिम्युअल ) करतात. या तोडीमुळे 80 ते 100 वर्षाच्या वृक्षाची दाट जंगले नष्ट होत आहेत. यामुळे पर्यावरणाचा -हास होऊन निसर्गाचा समोतल ढासळत आहे . यात जैवविविधता नष्ट होऊन पृथ्वी वरिल तापमानात वाढ होऊन पावसाचे प्रमाण कमी होत आहे , त्यामुळे कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळास सामोरे जावे लागत आहे . यामुळे मानवजातीस , पाळीव प्राणी व वन्य प्राणी जिव जंतुस धोका निर्माण होत आहे .

संशोधनानुसार जमीनीवर 33 टक्के वने असणे आवश्यक आहे . त्यामुळे महाराष्ट्र शासनाने 33 कोटी वृक्ष लागवड योजना आणली आहे. या योजनेत कोट्यवधी रोपे लावलेलो आहेत. पण ही योजना फारशी यशस्वी होताना दिसत नाही . यामध्ये सुधारणा करणे आवश्यक वाटते . एका वृत्तपत्राच्या प्रसिध्दी नुसार संशोधनाने 50 वर्षांच्या एका झाडाची किंमत मोजली असता त्या झाडापासुन मिळालेला ऑक्सीजन वायु अन्न साखळीची किंमत , जमीनीची थांबलेली धुप , सावली , पडलेला पाऊस , पशुपक्षाला दिलेला आश्रय लाकूड फाटा या सर्वाची बेरीज रुपये 50 लाख एवढी भरली . एका गंभीररित्या आजारी असलेल्या माणसास वाचविण्याकरीता दवाखान्यात ऑक्सीजनवर ठेवण्यात येते , एका ऑक्सीजन नळकांडीची किंमत अंदाजे 700 रूपये असते . एका माणसाला एका दिवसात 3 नळकांडया इतका ऑक्सीजन वायु लागतो. एका दिवसाला त्याची किंमत 2100 रूपये व एका वर्षाला प्रती माणसाला 766500 रूपयांचा ऑक्सीजन लागतो . यावरून महाराष्ट्रातील व देशातील जनतेला एका वर्षात किती अब्जो रूपयाचा ऑक्सीजन लागेल याचा हिशोबच लावता येणार नाही. जे की , वनापासुन आपणाला हे सर्व मोफत मिळत असते . शिवाय झाडापासुन मिळणारी सावली , जमीनीची धुप , पडलेला पाऊस पशु पक्षासाठी निवारा लाकूड फाटा इत्यादी फायदयाची तर किंमत लावलेलीच नाही . या सर्व बाबी मोफत मिळत असल्याने याची कोणालाही किमत वाटत नाही .
तोड होत असलेले जंगल तयार होण्याकरीता 70 ते 80 वर्ष लागतील. वन विभाग तोड करून त्या क्षेत्रात रोपे लागवड करतात , यामध्ये जास्तीत जास्त सागवान व त्या खालोखाल 1 ]बांबु , कडूनिम , करंज , सिताफळ , आवळा, चिंच, काशिद इत्यादी रोपे लावतात. लावलेली रोपे 100 टक्के जिवंत राहून मोठया वनामध्ये रूपांतर होतील याचा भरोसा नाही . कारण पुर्वी प्रमाणे पाऊस वेळेवर व पुरेसा पडत नाही तयामुळे लावलेली रोपे जगणार नाहीत नैसर्गीक वनामध्ये प्रजाती धावडा , सालई , ऐन , मोहा , चिंच , अंबा , चारोळी , तेंदू, आवळा , बेल , महारूरव , लोखंडी , सागवान, बीबा , हिरडा , बेहडा , धामन , बिजा , पाडळ , किन्ही ईबगोल , वावर्डीग , शिवणतिवस , नरक्या , पिटवन , अरू , जांभूळ असे अनेक प्रकारची फळे , औषधी , ईमारती ईत्यादी अनेक प्रकारची झाडे असतात. ही झाडे जैवविविधता आबाधित ठेऊन नैसर्गीक समतोल राखतात . तोड करून त्या क्षेत्रात या प्रजाती लावण्यात येत नाहीत. तोड करण्यापेक्षा उघड्या वनक्षेत्रात वर उल्लेख केलेल्या प्रजातीची लागवड करून 100 टक्के जीवंत ठेऊन त्यांची चांगल्या प्रकारे वाढ होण्याकरीता प्रयत्न होणे गरजेचे आहे . एका वर्तमान पत्रात मिलींद थत्ते यांनी लिहले आहे की , जंगल तोडीचे दोनप्रकार आहेत . 1 ) खाजगो टिबंर माफीया म्हणजे अवैद्य चोरटी तोड याला आळा बसविण्यासाठी एका वनरक्षकाकडे 500 हेक्टर क्षेत्र असावे . 2 ) सरकारी टिबंर माफिया यांचे अधिकृत नाव वनविकास महामंडळ असे म्हटले आहे यांचे कडून वनांचे जैवविविध नष्ट होऊन एकसुत्री इमारती रोपवने ( सागवान ) लावणे . व वन्यजीवांना त्रास देणे चालू आहे . महत्वाचे म्हणजे मुंबईच्या आरे कॉलनीमधील झाडे तोडी बद्दल मुंबई उच्च न्यायालयाने असहमती व्यक्त करून भविषात भावि पिढ्यांना चित्रातच झाडे दिसतील असे मत व्यक्त केले आहे . म्हणून महाराष्ट्रातील ज्या – ज्या जिल्हयातील तालुकांच्या वनक्षेत्रात वनविभाग , वनविकास महामंडळ , जंगल कामगार सहकारी संस्था व अन्य यंत्रणाकडून वनांची साफ तोड चालू असल्यास ती तोड थांबविण्यात यावे. असे वाटते . तोड करावयाचीच असल्यास साग व मिश्रजातीची झाडे, मेलेले, वाढखुंटलेले, पोकळ वारा वाढलेले, पडलेले अशा झांडाची तोड करण्यात यावी . तोड केलेल्या जागेवर बांबु किंवा सावलीत वाढणाऱ्या झाडांच्या प्रजाती लावून संरक्षण व संवर्धन करावे असे वाटते. असे केल्याने निसर्गाचा समतोल राहून पुढच्या पिढीला चांगले आरोग्यदाई जीवन जगता येईल यात शंका नाही . माननीय मुख्यमंत्री साहेब व आपण बाबींचा मानव कल्याणाकरीता सहानुभूतीपूर्वक विचार करून अंमलबजावणी करतील अशी अपेक्षा करतो असेही शेवटी निवेदनात शिवसेनिक निवृत्त वनाधिकारी नारायण सं . कटकमवार यांनी नमूद केले आहे. यावेळी अभि. महेश कटकमवार त्यांचे समवेत होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.