माहूर /किनवट तालुक्यातील मटका,गुटका,रेती व बेकायदेशीर धंदे बंद करा ; आ.केराम

किनवट/प्रतिनिधी:किनवट माहूर तालुक्याच्या पोलीस उपविभाग क्षेत्रांतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढले असून अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. स्थानिक पोलिस ठाण्यामध्ये कर्मचाऱ्यांचा रिक्त पदांचा अनुशेष कायम असल्याने अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असून अवैध धंदे बंद करण्यासाठी रिक्त पदांचा अनुशेष तातडीने भरण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.


तेलंगणा विदर्भाच्या सीमावर्ती भागात व दोन नंबरी व्यवसायिकांना सोयीचे स्पॉट म्हणून माफिया कंपनी मध्ये किनवट माहूरला विशेष पसंती दिली जाते.याचे महत्त्वपूर्ण कारण येथील पैनगंगा नदी व जंगलव्याप्त निर्मनुष्य रस्ते त्यामुळेच की काय गुटखा,रेती तस्करी,मटका व्यवसाय तेजीत सुरू आहे.दोन्ही तालुक्याचे गुटखा केंद्र म्हणून सा रखणी चे नाव अग्रक्रमावर आहे.रेती तस्करी थांबवण्यात महसूल विभागा पेक्षा पोलिस विभागाची कामगिरी वाखाणण्याजोगी होती.तर मटका व गुटखा या अवैध व्यवसायांवर लगाम लावण्यात पोलीसांना अपेक्षित यश आले नाही. याला कारण म्हणजे पोलिस विभागाकडे असलेले अपुरे मनुष्यबळ आहे.पोलीस ठाणे माहूर,सिंदखेड,मांडवी,किनवट, ईस्लापुर व नाविक ४७ यात तब्बल ११९ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.यामुळेच कि काय अधिकांश आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व भौगोलिक दृष्ट्या विस्ताराने मोठा असलेल्या किनवट व माहूर तालुक्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याची नितांत गरज असून त्याशिवाय कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे,गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्या बरोबरच बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्यासाठी पोलीस अधिक्षक नांदेड यांनी आवश्यक ते मनुष्यबळ निर्माण करून देण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी पत्राद्वारे केली आहे.दोन्ही तालुक्यातील पोलीस ठाणे व नगरपरिषद नगरपंचायत व आमदार भीमराव केराम यांचे लक्ष नसल्याची कुजबूज मागील काही दिवसापासून हलक्या आवाजात ऐकायला मिळत होती.परंतु आमदार केरामांच्या पत्रामुळे त्यांचे लक्ष तालुक्यातील दोन नंबरी व्यावसायिकांवर तर आहेच आहे.सोबत नगरपरिषद नगरपंचायत मधील विकासकामांवर ही असल्याचा प्रत्यय लवकरच येणार असल्याची माहिती विशेष सुत्रा कडून मिळाली आहे. तालुक्यातील विकास कामांवर आमदार भीमराव केराम यांनी लक्ष केंद्रित केल्यास दर्जाहीन बांधकाम करणार्‍या बांधकाम ठेकेदारांची उलट तपासणी सुरू झाल्याशिवाय राहणार नाही.सोबतच गुन्हेगारी प्रवृत्तीचा ही नायनाट होईल हे मात्र खरे…

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.