kinwat today news

फुटाने, लाह्या, गाठी विक्री करणा-या फकिरराव जुनगरे यांच्या मुलाने वैद्यकीय शिक्षणाकरीता आवश्यक असलेल्या निट या परिक्षेत ७२० पैकी ६२५ गुण प्राप्त करुन आई वडीलांच्या परिश्रमाचे केले चिज

किनवट ता.प्र दि १५ आयुष्यात काही करायची जिद्द असेल तर मनुष्याला कोणत्याही प्रकारची परिस्थिती त्याच्या जिद्दीला साकार करण्यापासुन आडवु शकत नाही. असेच एक ज्वलंत उदाहरण किनवट शहरात समोर आले आहे. शहरातील शिवाजी चौकात मयुर बुट हाऊस समोर फुटाने, लाह्या, गाठी विक्री करणा-या फकिरराव जुनगरे यांच्या मुलाने वैद्यकीय शिक्षणाकरीता आवश्यक असलेल्या निट या परिक्षेत ७२० पैकी ६२५ गुण प्राप्त करुन आई वडीलांच्या परिश्रमाचे चिज केले आहे.  
       रामप्रसाद फकिराराव जुनगरे यांने वैद्यकीय शिक्षण प्रवेश पात्रता परिक्षा म्हणजे निट परिक्षेत ७२० पैकी ६२५ गुण प्राप्त करुन संपुर्ण भारतात ऑल इंडीया रॅक १०१५९ प्राप्त केली तर त्याच्या प्रवर्ग एन.टी-१ मध्ये ७५० वी रॅक प्राप्त केली तर राज्यात एन.टी प्रवर्गात ३ री रॅक प्राप्त केली आहे. त्याच्या या नेत्रदिपक यशामुळे बाजारपेठेतील एकारात्रीतुन त्याच्या वडीलांची ओळख निर्माण झाली आहे. रामप्रसाद चे इयत्ता १० वी पर्यंत चे शिक्षण महात्मा फुले विद्यालय येथे झाले तर इयत्ता ११ व १२ वी फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे झाले तर पुणे येथे वास्तव्यास असतांना त्याला पुणे महानगर पालिकेचे डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह  शिवाजीनगर येथे तो राहत होता त्यावेळी त्याच्या बुध्दीमत्तेची चमक पुणे येथिल लाईफ फॉर इंप्लिमेंट या एन.जी.ओ. संस्थेला माहित झाल्या नंतर या संस्थेने त्याला कोचिंग पुरवली या कोचिंग मध्ये त्याला पुणे येथिल डॉ.अतुल ढाकणे यांनी कोचिंग मध्ये सहकार्य केले.
       कौटुंबिक स्थिती भक्कम नसतांना रामप्रसाद ने केलेला संघर्ष हा वाखाण्याजोगा आहे तर यामुळे त्याची लवकरच एक चांगल्य वैद्यकीय महाविद्यालत निवड होईल आणी हा संघर्ष असाच त्यांने आणखी ५ वर्ष केला तर एक चांगला हुशार वैद्यकीय अधिकारी ग्रामिण महाराष्ट्राला त्याच्या रुपात प्राप्त होणार आहे.
       आजकाल च्या मुलांना सर्व भौतिक सोई सुविधा या त्यांना त्यांच्या पाल्याकडुन उपलब्ध करुन देण्यात येतात तर मुलांच्या शिक्षणाकरीता व त्यांच्या शिक्षणा बाबत विविध टप्प्यावर हे पालक त्यांच्या करिता झटत राहतात व मुलांना नसते त्यापेक्षा त्यांच्या पालकाला जास्त काळजी असते तर मुलांना अभ्यासक्रम पाठ करवुन घेण्याच्या नादात पालक पुर्ण अभ्यासक्रम पाठ करुन घेतात या अशा परिस्थितीत हि मुलांना म्हणावे तसे गुण प्राप्त होत नाही तरी पालक हताश न होता वशिला लावतात, पैसे भरतात व काही झटपट करुन आपल्या मुलांना विविध अभ्यासक्रमात प्रवेश मिळवुन देतात, परंतु किनवट शहरातील जुनगरे कुटुंबियांचे हे उदाहरण थोडे वेगळे आहे हातावर पोट, घरात अठराविश्व दारिद्र्य, काम केल तरच चुल पेटणार अशा नाजुक परिस्थितीत जर एखाद्या ने संघर्ष करुन शिक्षण शिकतो म्हणट तरी ते तारावरची कसरत ठरणार परंतु हि कसरत रामप्रसाद गुनगरे यांनी जिंकुन एक नविन आदर्श निर्माण केला आहे. तर त्याचे आई वडील हे किनवट शहरात प्रसिध्द असलेल्या व दक्षिण भारतात सर्वत्र धारण करत असलेली श्री अयप्पा स्वामी यांची दिक्षा जी हिवाळ्याच्या दिवसात येते व अत्यंत कठीण अशी दिक्षा असते ज्यात गृहस्थाश्रम सोडुन ४१ दिवस हे संन्यासी जिवन जगावे लागते व उपवास असतो अशा खडतर दिक्षा रामप्रसाद चे आई वडील गेल्या अनेक दिवसा पासुन नित्यांने धारण करतात तर संसाराचा गाडा चालवण्यासाठी शहरातील शिवाजी चौकात फुटाने, लाह्या, गोड गाठी विकतात तर रामप्रसाद ची आई याकामी त्याच्या वडीलांना साथ देते व घरात फुटाने फोडणे सह विविध कामात हातभार लावते.
       जुनगरे कुटुंबाने केलेला संघर्ष हा समाजासाठी एक आदर्श आहे तर आता समाजातील दानशुर व उदार सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येउन समाजातील अशा गुणवंत विद्यार्थ्यांला सहाकार्य केले पाहिजे असे आवाहन समाजातील विविध स्तरातुन होत आहे कारण रामप्रसाद सारख्या गुणवंतांना वाव दिले तर समाजाला एक उ्च्च कोटीचा डॉक्टर प्राप्त होणार आहे.
        
       

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply