kinwat today news

विना परवानगी अवैध सागी माल वाहतूक करीत असताना सागाचे 5 नग जप्त

किनवट टुडे न्युज/बोधडी: आज दिनांक 14/11/2020 रोजी राञी गस्त करीत असतांना रात्री 10 वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्र – बोधडी अंतर्गत लिंगदरी बिटा मधून चिखली च्या दिशेने डोक्यावर सागवाण विना परवानगी अवैध वाहतूक करीत असताना पकडला गेला व ऐवज जप्त केला आहे. सागी नग 5 पकडले असून आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.
सदर कार्यवाही मा. वनपरिक्षेञ अधिकारी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी बी टी जाधव साहेब, वनरक्षक रंगे , माळी,दांडगे,सपकाळ व पाटोदा राऊंड बालाजी राठोड ,वनमजुर सहभाग होते.वनगुन्हा वनपाल पाटोदा यांनी नोंद केला आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply