kinwat today news

देशपिता लहुजी साळवे यांचा 226 वा सार्वजनिक जयंती महोत्सव निमित्त लहुमुद्रा प्रकाशन सोहळा संपन्न

किनवट टुडे न्युज /परभणी : देशपिता लहुजी साळवे यांचा 226 वा सार्वजनिक जयंती विविध कार्यक्रमानी परभणी शहरात साजरा करण्यात आला त्यामध्ये सकाळी 10 : वा लहुजी नगर येथे मा आ मोहन फड यांच्या हस्ते ध्वजारोहन करुन देशपिता लहुजी साळवे यांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले या वेळी मा राधाजी शेळके, सुरेश भुमरे, आकाश लोहट, सार्वजनिक जयंती अध्यक्ष बाळासाहेब साबळे, शिवाजी शेळके, बन्सीलाल भंडारी, काशिनाथ गायकवाड, उपस्तित होते यानंतर हॉटेल अतिथी स्टेडियम परिसर येथे अभिवादन सभा घेण्यात आली या वेळी लहुमुद्राचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा राधाजी शेळके, बालासाहेब पवार, बन्सीलाल भंडारी, गणपत कांबळे, शिवाजी शेळके, प्रा अंकुश कांबळे, गणेश घोडे, के के भारसाकळे, करण लोंढे, राजेश ताटे, आदी मान्यवर उपस्थित होते
या जयंती महोत्सव यशस्वीतेसाठी जयंती अध्यक्ष बाळासाहेब साबळे, शिवाजी शेळके, काशिनाथ गायकवाड, मिलिंद दुधाने,हनुमान शिंदे, दिलीप सावळे, विनायक शिंदे, गणेश बोराडे, रामभाऊ गवारे, लहु गायकवाड, चंद्रकांत लोंढे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले..

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply