kinwat today news

लसाकम च्या वतीने लहुजी साळवे यांची 226 वी जयंती साजरी.

अहमदपूर प्रतिनिधी:
आज दि.14 नोव्हेंबर रोजी लसाकम शाखा अहमदपूर च्या वतीने क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची 226 वी जयंती साजरी करण्यात आली.

या प्रसंगी प्रख्यात व्याख्याते, प्रा.डॉ.मारोती कसाब सर यांच्या हस्ते लहुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख वक्ते डॉ.कसाब सर यांनी लहुजी साळवे यांच्या जीवन कार्याबद्धल मार्गदर्शन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

या अभिवादन सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.बालाजी कारामुंगीकर हे होते. तसेच माजी ता.अध्यक्ष मा.अंतराम पिटाळे सर, जेष्ठ साहित्यीक माजी प्राचार्य मा. तुकाराम हरगिले सर, माजी ता.अध्यक्ष नरसिंग सांगवीकर सर, मा.बालाजी जंगापल्ले सर,मा.नरसिंग मामा कांबळे,मा.गणेश वाघमारे सर (ता.कोषाध्यक्ष) मार्गदर्शक मा.प्रा.दिलीपराव भालेराव सर ,प्रा.संभाजीराव दुर्गे सर,
मुख्याध्यापक श्री ग्यानोबा घोसे सर,मा.राजकुमार गोंटे सर, मा.शरद कांबळे सर,प्रोटॉन चे जिल्हाध्यक्ष प्रा.सतीश ननिर सर, मा.अंकुश पोतवळे सर,मा.दशरथ शिंदे सर, मा.मनोहर माने सर,मा.शिवाजी सूर्यवंशी सर,मा.कांबळे एस.के.सर, तसेच सामाजिक कार्यकर्ते मा.तरुडे विठ्ठल, मा.पोतवळे मुरहारी , मा.तरुडे नवनाथ, मा.गायकवाड राजीव संग्राम इत्यादी उपस्थित होते

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मा.गंगाधर साखरे सर यांनी केले तर प्रास्ताविक ता.अध्यक्ष मा.रमेश भालेराव सर आणि आभार मा.राजकुमार गोंटे सर यांनी मानले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply