kinwat today news

पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील खरेदीसाठी किनवट तालुक्यात जलधारा,चिखली, अप्पारावपेठ, वाई खरेदी केंद्रे निश्चित: कर्तार साबळे यांच्या पाठपुराव्याला यश

बिल्लोरी, जलधरा : पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील खरेदीसाठी किनवट तालुक्यात जलधारा,चिखली, अप्पारावपेठ, वाई खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर तहसीलदार काकणे व शासनस्तरावर त्यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर यांनी खरेदीसाठी ज्वारी मका धान खरेदी केंद्रे निश्चित केली आहेत.
पावसामुळे मोठ्या प्रमाणात हातातून पिके गेले असले तरीही जो काही शिल्लक आहे विक्री करून मिळेल ती किंमत पदरात पाडून घेण्याच्या मानसिकतेत शेतकरी आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ होईल यासाठी शेतकऱ्यांमार्फ़त भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी कर्तार साबळे यांनी प्रयत्न केले होते. त्याला देखील मान्यता देण्यात आली आहे. आता थेट शेतकऱ्यांकडून भरडधान्य खरेदी करण्यात येणार आहे, यावेळी कर्तार साबळे, संतोष घुगे, धनपाल साबळे, नितीन सावते, आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply