kinwat today news

बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा

किनवट टुडे न्यूज : बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा करण्यात आला. प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ एस.के.बेंबरेकर यांनी मौलाना अबुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.पंजाब शेरे यांनी शिक्षण दिवसाचे महत्त्व व मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवन कार्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद यांनी केलेले भरीव कार्य सांगून ते एक प्रसिद्ध विचारवंत, लेखक, कवी होते. या विषयाच्या अनुषंगाने माहिती दिली. याप्रसंगी रासेयो सल्लागार डॉ. आनंद भालेराव, डॉ. अंबादास कांबळे, राजेंद्र धात्रक,ग्रंथपाल मंदाकिनी राठोड,प्रा.डाॅ.सुरेंद्र शिंदे,राष्ट्रीय छात्र सेना विभागप्रमुख प्रा. काझी एस. एस., महिला रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. सुलोचना जाधव, डॉ. लता पेडलवाड, प्रा. शेषराव माने यांची उपस्थिती होती. क्रार्यक्रम आयोजक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी आभार मानले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply