kinwat today news

नागझरी मध्यम प्रकल्पातून किनवट नगरपालिकेसाठी होऊ घातलेल्या नवीन पाईप लाईन रद्द करण्याबाबत मांडवा दिगडी नागझरी येथील गावकऱ्यांनी दिले सहायक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

किनवट टुडे न्युज: (आनंद भालेराव) आदिवासी बहुल मौजे मांडवा(की.) दिगडी, नागझरी तालुका किनवट या क्षेत्रातील ग्रामपंचायतीतील व बेल्लोरी नगरपालिका हद्दीतील गावे असून या भागातील शेतकरी बहुतांश अल्पभूधारक आहेत तसेच या भागात शेतकरी आत्महत्याचे प्रमाणही वाढलेली आहे. तेव्हा या भागातून नवीन होऊ घातलेली पाणीपुरवठा पाईपलाईन रद्द करावी अशा प्रकारचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किनवट यांच्याकडे देण्यात आले आहे.
तसेच सदरील पाईपलाईन रद्द करण्यात यावी अन्यथा समस्त शेतकरी होऊ घातलेली नवीन पाईप लाईन होऊच देणार नाही. जे जुनी पाईपलाईन आहे तेही बंद पाडल्या जाईल, आमच्या मागणीचा योग्य तो विचार करून कारवाई करावी व नगरपालिकेला प्रतिबंधित करावे.
अन्यथा मागणी मान्य होईपर्यंत उपोषणे, आंदोलने अधिक उग्रपणे करावे लागतील असा इशाराही या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी दिला आहे .
सदरील निवेदनाच्या प्रतीलीपी तहसीलदार किनवट, उपविभागीय अधिकारी किनवट, मुख्य कार्यकारी अधिकारी किनवट, आमदार भीमराव केराम यांना देण्यात आले आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply