kinwat today news

परिवहन महामंडळाच्या किनवट आगारातील तांत्रीक कर्मचारी रामराव पिटलेवाड १० नोव्हेंबरच्या रात्री आगारात कर्तव्यावर असतांना ह्रदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन

किनवट/प्रतिनिधी— परिवहन महामंडळाच्या किनवट आगारातील तांत्रीक कर्मचारी रामराव पिटलेवाड (वय वर्ष ५६) १० नोव्हेंबरच्या रात्री आगारात कर्तव्यावर असतांना ह्रदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (११ नोव्हेंबर) किनवट येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसल्याच्या प्रतिक्रीया ऐकायला मिळाल्या.
रामराव पिटलेविड हे मुळचे माहूर तालुक्यातील पडसा (वडसा) येथिल रहिवासी आहेत. किनवट आगारात ३० ते ३२ वर्षापासून सेवारत होते. तांत्रीक विभागात त्यांनी महत्वाच्या पदावर चोखंदळ काम बजावले. मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा अनेकांशी संपर्क आला. १० नोव्हेंबर २०२० रात्री पिटलेवाड हे आगारात कर्तव्य बजावत असतांना रात्री ११ वाजताचे दरम्यान ह्रदय विकाराच्या झटक्याने अचानकच त्यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे.
रामराव पिटलेवाड यांच्या निधनामुळे आगार प्रमूख मिलींद सोनाळे यांच्यासह सर्वच वाहक-चालक, कर्मचा-यांनी छोटेखानी कार्यक्रमात शोक व्यक्त करुन श्रद्धांजली अर्पीत केली. आज (११ नोव्हेंबर) दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून आगारातील अधिकारी-कर्मचारी तसेच त्यांच्या चाहत्यांनी उपस्थिती लावली होती.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply