kinwat today news

प्राध्यापक येरडलावर यांची मोदी विचार मंचाच्या ता.अध्यक्षपदी निवड

किनवट प्रतिनिधी: किनवट येथील बळीराम पाटील कॉलेजचे प्राध्यापक पुरुषोत्तम येरडलावर यांची नरेंद्र मोदी विचार मंच च्या किनवट तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी आमदार भीमराव केराम यांनी प्राध्यापक पुरुषोत्तम येरडलावर यांचे पुष्पगुच्छ देऊन व नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन केले.तर त्यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष रवी भाई चाणक्य यांच्या संमतीने जिल्हा अध्यक्ष महेश देशपांडे यांनी केली आहे. यावेळी किनवट नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अनिल तिरमनवार, युवकांचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष चनमनवार,सतीश बिराजदार, विश्वास कोल्हारीकर,नरसिंह तक्कलवार आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply