kinwat today news

किनवट येथे पूर्ववत आर.टी.ओ कॅम्प पूर्ववत सुरू; वरिष्ठ परिवहन निरीक्षक श्री अनासाने व वरिष्ठ परिवहन निरीक्षक श्री फूनसे यांचा किनवटवासीयां कडून सत्कार.

किनवट प्रतिनिधी: मार्च 2020 नंतर लॉकडाऊन मुळे किनवटचा मासिक आर.टी. ओ. कॅम्प बंद होता. तो दिनांक 10 नोव्हेंबर 2020 रोजी किनवट तालुकाकरिता पूर्ववत सूरु झाला. त्या प्रसंगी वरिष्ठ परिवहन निरीक्षक श्री अनासाने व वरिष्ठ परिवहन निरीक्षक श्री फूनसे हे कॅम्प पूर्ववत सुरू करण्याकरिता श्रीनिवासा ऑटोमोटिव्ह हिरो शोरूम येथे आले असता त्यांचे किनवटवासीयां कडून सत्कार करण्यात आला. व किनवटवासियाची नांदेड चा फेरा मारण्या पासून मुक्तता केल्यामुळे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच नांदेड च्या परिवहन कार्यालयाचेही आभार व्यक्त करण्यात आले, कॅम्प पूर्ववत सुरू करण्यासाठी आ. भीमराव केराम, न .प बांधकाम सभापती व्यंकट नेम्मानिवार व गुरुप्रीत सिंग सोखी यांनी पाठपुरावा केला.
या प्रसंगी श्रीनिवासा ऑटोमोटिव्ह हिरो शोरूम चे मालक तथा किनवट नगरपालिका चे माजी उपाध्यक्ष श्रीनिवास नेमानिवर यांनीही परिवहन निरीक्षक यांचा सत्कार केला.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply