kinwat today news

सिडको नांदेड येथे विद्यार्थी दिवस  उत्साहात साजरा .

नवीन नांदेड/०७नोव्हेंबर
रयत सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा ०७ नोव्हेंबर हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

७ नोव्हेंबर १९०० हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी साताऱ्यात प्रतापसिंह हाय स्कुल येथे शाळा प्रवेश दिन ही अत्यंत महत्वाची आणि इतिहासाला कूस बदलावयास लावणारी क्रांतिकारी घटना ठरते…डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आजीवन…विद्यार्थी होते.त्यांनी आपली…विद्या व्यासंग आयुष्याच्या शेवटपर्यंत जपली.

याची आठवण म्हणून…विद्यार्थी दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन रयत सेवाभावी संस्थेचे संचालक प्रा. इरवंत सुर्यकार यांनी प्रास्ताविक केले उपस्थित मान्यवर चे हस्ते महामानवाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..

या कार्यक्रमस उपस्थित मान्यवर मा.श्रीरंग खांनजोडे(पेंटर),आंबेडकरवादी युवा मंच प्रमुख मा.राजुभाऊ लांडगे,शाहीर प्रा. गौतम पवार, काकांडी गावचे उपसरपंच मा.सुदिन प.बागल, मा.कैलाश गायकवाड, विशाल वाघमारे, चंद्रकांत मेटकर, अन्य उपस्थिती होती.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply