kinwat today news

माहूर ओबीसी संघटना मार्फत शासनाला विविध मागण्यांचे निवेदन.

माहूर प्रतिनिधी:    माहूर ओबीसी संघटना मार्फत शासनाला विविध मागण्यांचे निवेदन.*माहूर तालुक्यातील ओबीसी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी माहूर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकारला देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य सरकार मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर करून राज्याचा कारभार ठप्प केले असून नोकर भरती बंद पडली आहे तसेच एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्याने लाखोच्या संख्येने बेरोजगार तरुण नोकरीसाठी वणवण भटकत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने केवळ मराठा आरक्षण संदर्भात स्थगिती दिली असून, राज्य सरकार मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर ठेवून आपला बचाव करीत असल्याचा आरोप माहूर तालुक्यातील विविध ओबीसी संघटनेने केला आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारला याची जाणीव असताना की सर्वोच्च न्यायालयाने केवळ मराठा आरक्षणा संदर्भात स्थगीती दिली आहे.
नोकर भरती किंवा एमपीएससी परीक्षेसाठी नाही राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना किमान एक लाखाची नुकसान भरपाई ताबडतोब दिली पाहिजे व महाराष्ट्र शासनाने त्वरित एमपीएससी परीक्षा घेऊन थांबवलेली नोकर भरती त्वरित सुरू करावी, लपून ठेवलेला गायकवाड आयोगाचा अहवाल जनतेसाठी उघड करून खोटी कुणबी सर्टिफिकेट घेऊन ओबीसी आरक्षणाचा फायदा लाटणाऱ्या विरुद्ध समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, कुणबी सर्टिफिकेट असलेल्या स्त्रीने मराठा व्यक्तीशी विवाह केल्यानंतर ती मराठा कुटुंबाची सदस्य बनते त्यामुळे तिचे कुणबी सर्टिफिकेट रद्द करावे,
मराठा जातीला EWS कॅटेगिरीत समाविष्ट करून त्यांच्यासाठी वेगळे पंधरा टक्के आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने विधानसभेत विधेयक मांडून तसा कायदा करावा, महा ज्योती संस्थेला किमान पाचशे कोटी व ओबीसी वित्त महामंडळाला शंभर कोटी रुपयांचा निधी देऊन ओबीसी विद्यार्थी व ओबीसी बेरोजगारांना त्वरित वाटप करून ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित अदा करावी, 2021 च्या जनगणनेत ओबीसींची जातीनिहाय जनगणना होत नसल्याने महाराष्ट्र शासनाने व प्रशासनाने राष्ट्रीय जनगणनेवर बहिष्कार टाकावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन दिनांक 3 नोव्हेंबर रोजी माहूर ओबीसी संघटनेच्या मार्फत माहूर तहसीलच्या माध्यमातून अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष पद्मा जयंत गिर्हे यांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील बेहेरे, समता परिषद शहराध्यक्ष सचिन बेहेरे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती किसन दामा राठोड, शिवसेना माहूर शहराध्यक्ष निर्धारी जाधव,समता परीषद अध्यशा सुरेश गि-हे नगरसेवक इल्यास बावानी,अनिल वाघमारे, छायाताई नर्सिंग राठोड, जयश्री चव्हाण, डी.डी. चव्हाण,कैलास मोहूले, पवन गवळी,धीरज बेहेरे आदीजण उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply