kinwat today news

व्यापाऱ्यावरील हल्ला प्रकरणातील दरोडेखोरांना अटक करावी; व्यापाऱ्यांचे तहसिलदारांना निवेदन

मुदखेड ता.२( शेख जब्बार )
मुदखेड येथील सराफा व्यापारी राघवेंद्र पवार यांच्यावरील झालेल्या दरोडेखोरांचा हल्ला प्रकरणी आज शहरातील व्यापाऱ्यांनी सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त केला यानंतर हल्लेखोरांना तात्काळ अटक करून व्यापाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी मागणीसाठी व्यापार यांच्या वतीने मुदखेड चे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
मुदखेड शहरात ता.३१ रोजी सायंकाळी ७: ४५ वा. म्हणजेच व्यापार पेठ गजबजलेली असताना अज्ञात दरोडेखोरांनी प्रसाद ज्वेलर्सचे सराफा व्यापारी राघवेंद्र पवितवार यांनी आपले सराफी दुकान बंद करून त्याच इमारतीत वरच्या मजल्यावरती असलेल्या घराकडे जात असताना दुकानाच्या ओट्यावरतिच अचानक दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला करून त्यांच्याकडील सोन्या-चांदीच्या दागिन्याची व रोख रकमेची असलेली बॅग पळवण्याचा प्रयत्न केला यादरम्यान सराफा व्यापारी राघवेंद्र पवितवार यांनी त्या दरोडेखोरांशी हिमतीने झुंज दिली यामध्ये हे दरोडेखोर ऐवज लंपास करण्यात अयशस्वी झाले परंतु या दरोडेखोरांनी राघवेंद्र पवितवार यांना जीवे मारण्याच्या हेतूने गावठी पिस्तूल कट्टा काढून गोळी झाडण्याचा प्रयत्न करत असताना त्या गावठी पिस्तूलातील काडतूस जमिनीवरती पडले त्यामुळे पिस्तुलातून गोळ्या झाडता आल्या नाहीत सुदैवाने सराफा व्यापारी राघवेंद्र पवितवार हे बालबाल बचावले हा प्रकार चालू असताना समोरच्याच युवा व्यापारी गजानन पडोळे यांनी धाव घेतली असतात हे दरोडेखोर पसार झाले.
मुदखेड शहरामध्ये हे मागील पन्नास वर्षाच्या कालावधीत आज पर्यंत व्यापार्यावरती हल्ला होण्याचे किंवा व्यापार पेठेत दरोडा घालून लूटमार करण्याचे प्रयत्न कधीही झाले नव्हते आज गुन्हेगारांची मुदखेड शहरात मोठी हिम्मत वाढलेली दिसत आहे मुदखेड शहरात दर रविवारी आठवडी बाजार भरतो या बाजारपेठ मध्ये लोकांचे मोबाईल लंपास केले जातात तर कोणाचे पाकीट मारले जाते, मुदखेड शहरामध्ये मागील काही दिवसापासून दुचाकी चोरांचेही प्रमाण वाढले आहे घरफोड्यांचे हे प्रमाण वाढलेले आहे म्हणजेच मुदखेड शहरामध्ये हे गुन्हेगारांचे वास्तव्य वाढल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. व्यापाऱ्यांना पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा देऊन आमचे गुन्हेगारांना पासून संरक्षण करावे
मुदखेड शहराच्या व्यापार पेठेमध्ये हे आम्ही व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला पोलीस चौकी उभारून दिलेली आहे या ठिकाणी सुरक्षेसाठी पोलीस शिपाई देऊन चौकी चालु करावी आमचा पोलीस प्रशासनावर संपूर्ण विश्वास असून पोलीस प्रशासनाने मुदखेड च्या बाजारपेठेत दुपारी बारा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत पोलीस जवानांची गस्त वाढून आम्हाला सुरक्षा द्यावी व राघवेंद्र पवितवार यांच्यावरती भ्याड हल्ला केलेल्या या अज्ञात दरोडेखोरांचा छडा लावून त्या दरोडेखोरांना जेरबंद करावे जेणेकरून कडक शासन करावे यापुढे बाजारपेठेतील तील व्यापाऱ्यांवरती असे जीवघेणे हल्ले होणार नाहीत व आम्ही सर्व व्यापारी सुरक्षित राहू अशी मागणी एका निवेदना द्वारे करण्यात आली. आम्हा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमच्या भावना लक्षात घेऊन दरोडेखोरांना पकडून शासन करावे बाजारपेठे पोलीस गस्त वाढवून किंवा पोलीस चौकी चालू करून व्यापार पेठेत असलेल्या व्यापाऱ्यांना व व नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनाच्या प्रति जिल्हाधीकारी नांदेड, जिल्हा पोलिस अधिक्षक नांदेड, पालकमंत्री आशोकराव चव्हाण, पोलिस निरिक्षक मुदखेड यांना देण्यात आल्या
या वेळी व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ गणपती मंदिर पासुन पायी तहसिल कार्यालयात जाऊन नायब तहसिलदार जोगदंड यांना निवेदन देण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक गंगाधर डांगे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करुन घटनेचा निषेध व्यक्त केला.
तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनावर बाजार समितीचे संचालक संदिप पाटील गाढे, गटनेते माधव कदम, शंकर राठी, ओम सोनी, प्रविण काचावार, कालिदास जंगीगीलवाड, सदाशिव शहाणे, सुरेश शहाणे, सराफा व्यापारी मुकेश मामीडवार, गजानन कदम,गिरिष कोत्तावार, किशोर पारवेकर, सचिन चंद्रे, राजु आप्पा रायपत्रेवार, संतोष कालानी, ईलियास पठाण, मुजीब पठाण मनिष चक्करवार, गोविंद गोपनपल्ले, पुरुषोत्तम चांडक, निळकंठ पडोळे, ईश्वर पिन्नलवार, इशान चक्करवार, अमोल आडकीणे, रवि शहाणे, संजय गाळगे,मुदखेड अध्याक्ष तालुका पत्रकार शेख जब्बार यांचे सह मुदखेड शहरातील व्यापारी मोठया संख्येने उपस्थीत होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply