kinwat today news

बंजारा समाजाचे धर्मगुरु, संत, तपस्वी डॉ. रामरावजी महाराज यांचे पोहरादेवी येथे खा. हेमंतभाऊ पाटील यांनी घेतले अंत्यदर्शन व कपिलजी महाराज यांची सांत्वनपर भेट

किनवट टुडे न्युज पोहरादेवी: संत सेवालाल महाराजांचे वंशज,श्री क्षेत्र पोहरादेवी संस्थानचे मठाधिपती तथा संपूर्ण बंजारा समाजाचे धर्मगुरु, संत, तपस्वी डॉ. रामरावजी महाराज यांचे आज पोहरादेवी येथे हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी स्व.डॉ. रामरावजी महाराज यांचे बंधू बाबुसिंगजी महाराज व श्री क्षेत्र पोहरादेवी संस्थानचे अध्यक्ष कपिलजी महाराज यांची सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासह जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, हिंगोली जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे,कळमनुरी पं.स.चे माजी उपसभापती गोपू पाटील यांची उपस्थिती होती.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply