kinwat today news

अम्मा ! खासदार हेमंतभाऊ पाटील उन्नडा …गोकुंद्यातील महिला मंडळाच्या कोजागिरीला आले आनंदाचे उधान !

किनवट / प्रतिनिधी : … अम्मा ! खासदार हेमंतभाऊ पाटील उन्नडा … राधाबाई रामलू कोत्तुरवार एकदमच उद्गारल्या… सर्व महिला अवाक् झाल्या…गोकुंद्यातल्या राजर्षी शाहू नगरातील महिला कोजागिरी पौर्णिमा साजरी करतांना … कोणतीही पूर्वकल्पना नसतांना अचानक खासदार हेमंत पाटील आले. तिथे गुंडाळून असलेली चटई त्यांनी स्वतः काढली, खाली अंथरली, त्यावर बसले, अन् पात्र समोर घेऊन म्हणाले, काय काय शिजवताय ? वाढा आम्हाला. सर्व महिला अचंबित झाल्या. खासदार माणूस स्वतः येतात, ना थाट, ना बाट,सर्व सामान्यात मिसळतात, जे असेल ते स्वतः आग्रहानं मागून खातात, सर्वांची ख्याली खुशाली विचारतात, एकोप्यानं उत्सव साजरा करणाऱ्या महिला मंडाळांचं कौतुक करतात , त्यांना शुभेच्छा देतात, हे सगळं पाहून सर्वसामान्यांना आश्चर्याचा धक्का बसल्या शिवाय राहात नाही.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोजागिरीचा चंद्र उगवला … एकेक कलाने पुढे सरकू लागला .. राजर्षीशाहूनगर मधील महिला एकत्र आल्या . एका चुलीवर मोठ्या पातेल्यात दूध तापत होतं … काही महिलांनी खिचडी तयार करून बसल्या होत्या… काही महिला गरम भजे तळत होत्या… रात्री 9.27 ची वेळे तिथे अचानक खासदार हेमंतभाऊ पाटील यांची गाडी आली… त्यामधून ते उतरले… अचानक पायी चालत या महिलांच्या कार्यक्रमाच्या स्थळी आले. त्यांनी स्वतः तिथे असलेली छोटी चटई उचलली . खाली नालीवर टाकलेल्या फरशीवर अंथरली. ते स्वतः बसले. मग आपसूकच सर्व कार्यकर्ते आजूबाजूला बसले. त्यांनी महिलांना विचारलं, काय बनवत आहात ? गरमागरम खिचडी भजे द्या आम्हाला. त्या महिलांनी त्यांचा पाहुणचार केला. त्यांना खिचडी , भजे व मसालेदार दुध दिले. सर्वसामान्य महिलांच्या या कार्यक्रमाला खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी अचानक हजेरी लावून त्यांच्यात समरस होऊन त्यांनी त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस केली आणि आपुलकीने त्यांच्या एकत्र उत्सव साजरा करण्याला शुभेच्छा दिल्या. हे सगळं पाहून सर्वसामान्य माणसांमध्ये वावरणार्‍या खासदार हेमंतभाऊंच्या कृतीला सर्व महिलांनी सलाम ठोकला. कारण आजपर्यंत त्यांनी असं कधी अनुभवलं नव्हतं कोणता आमदार-खासदार अशा पद्धतीने कोणतीही पूर्वकल्पना न देता कोणतेही निमंत्रण न देता अचानकपणे येतात आणि महिला घोळका काय करत आहे ? त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्यात मिसळतात आणि त्यांच्याच सोबत चार घास खातात. म्हणजे सर्वसामान्यांशी आपुलकीने वागणारा हा कर्तव्यनिष्ठ असा लोकप्रतिनिधी आपल्याशी संवाद साधून आपल्या अडीअडचणी समजून आपल्याला प्रोत्साहित करतोय याबद्दल सर्व महिलांनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं अन् त्यांच्या कृतीला त्यांनी सलाम ठोकला. राजर्षी शाहू नगरातील राधाबाई रामलु कोत्तरवार, प्रियाताई राजू कुमरे, अंजलीताई कपिल रेड्डी, पद्मीनाताई मुसळे, उज्वला गणपत मडावी, प्रभा सुदर्शन मेश्राम, ललिता मुसने, अनुताई खिसले, मेघा कोत्तुवार, सपना बटूर, रमा परमेश्वर गायकवाड या महिलांनी यावर्षीची कोजागिरी पौर्णिमा अचानक आलेल्या खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्यासोबत साजरी करून एक वेगळा आनंद आम्हा महिला मंडळास मिळाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply