kinwat today news

कोविड सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकांना आरोग्य सेवेत समाविष्ट करा; आमदार भीमराव केराम यांची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी.

किनवट/प्रतिनिधी:
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्यापार्श्वभूमीवर शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना साठी कोविड केअर सेंटरची निर्मिती केली होती.त्यात सेवारत आरोग्य सेविकांनी निसंकोच सेवा बजावली होती. परंतु आता कोरणा आजार नियंत्रणात येत असल्याने कमी रुग्णसंख्या असलेले कोविंड सेंटर बंद केले जात आहे यात कार्य करणाऱ्या एएनएम व जीएनएम यांना कार्यमुक्त केले जात आहे. परंतु यांनी दिलेल्या प्रमाणिक सेवेचेमहत्त्व विचारात घेऊन त्यांना कंत्राटी तत्वावर आरोग्य सेवेत सामावून घेण्याची मागणी एका पत्रकाद्वारे किनवट मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर शासनाने जिल्हा व प्रमुख शहरांसह तालुक्याच्या ठिकाणी ठिकाणी कोविड केअर सेंटरची निर्मिती केली होती.व त्यात खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य सेविका जसे एएनएम व जीएनएम यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता निसांकोच सेवा दिली आहे.आजाराचा प्रादुर्भाव कमी होत होऊन रुग्ण संख्या ही कमी होत आल्याने शासनाने कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे एएनएम व जीएनएम यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे.संकट समयी सेवा देणाऱ्या व कोरोना काळात आरोग्य सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या आरोग्य सेविकांना एका आदेशात बेरोजगार केले जाणार आहे.एएनएम व जीएनएम त्यांना कंत्राटी तत्वावर आरोग्य सेवेत समावून घेण्याची मागणी चे साकडे त्यांनी आमदार भीमराव केराम यांना घातले होते.या बाबीची व त्यांनी दिलेल्या सेवेचे महत्त्व अनन्याधारण असून त्यांच्या रास्त मागणी साठी आमदार भीमराव केराम यांनी पुढाकार घेतला असून दिनांक ३१ रोजी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवून कोरोना काळात कोविड केअर सेंटर मध्ये सेवा देणाऱ्या आरोग्य सेविका यांना ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कंत्राटी तत्वावर सेवेत समावून घेण्याची मागणी केली आहे.शिवाय या विषयी येत्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडणार असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply