kinwat today news

किनवट येथील साई मंगल कार्यालयात कैकाडी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कैकाडी समाजाचा विभागस्तरीय परिवर्तन मेळावा खा.हेमांतभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

किनवट प्रतिनिधी: किनवट येथील साई मंगल कार्यालयात कैकाडी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कैकाडी समाजाचा विभागस्तरीय परिवर्तन मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिंगोली चे लोकप्रिय खासदार माननीय हेमंत भाऊ पाटील तसेच किनवट/ माहूर चे लोकप्रिय आमदार मा. भीमराव केराम होते.

याप्रसंगी कैकाडी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मान्यवरांच्या हस्ते कैकाडी महाराजांच्या भव्य फोटोस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर समाजातील अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडून व समाजास प्रबोधन केले.
याप्रसंगी बोलताना मा. हेमंत पाटील म्हणाले की,या समाजातील मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले पाहिजे तसेच या समाजातील मुले मोठ्या प्रशासकीय पदावर पोहोचली पाहिजे यासाठी आपल्या मुलांना शाळेत पाठविले पाहिजे तसेच यासमाजातील कार्यकर्ते ही मागे न राहता सत्तेत सामील झाले पाहिजे , कैकाडी समाज हा गरीब हातावर पोट असणारा समाज आहे. यांचा मुख्य व्यवसाय हा नदीत डुबकी मारून रेती काढून विकणे आहे. त्यामुळे हा समाज अत्यंत गरीब असल्यामुळे यांच्या यांच्याकडून कुठल्याच प्रकारची रॉयल्टी घेतल्या जाऊ नये. अशा प्रकारचे नियम करण्याची आवश्यकता आहे .अधिकाऱ्यांनीही या समाजाकडे विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या समाजाला समाज मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

किनवट सारख्या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच अशाप्रकारचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन कैकाडी समाजातील युवक कार्यकर्त्यांनी केले होते .कार्यक्रम घेण्यासाठी समाजातील युवकांनी चांगलाच पुढाकार घेतला होता.
याप्रसंगी बोलताना किनवटचे आमदार भीमराव केराम यांनीही समाजास मार्गदर्शन करून कैकाडी महाराजा यांच्या विषयी सविस्तर माहिती सांगितली.

या कार्यक्रमास किनवटचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा दादा खराटे माजी नगराध्यक्ष के मूर्ती माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमानी वार,नरेंद्रजी पवार,श्री माने साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply