kinwat today news

धर्मांतरित जनजातींच्या लोकांना मूळ जातींचा लाभ देऊ नये -आ.भीमराव केराम

किनवट प्रतिनिधी: जातीच्या चालीरीती व परंपरा चा त्याग करून यांनी धर्मांतर केले आहे. अशा नागरिकांना त्यांच्या मुळ जातीचा लाभ दिला जाऊ नये अशी मागणी जनजाती सुरक्षा मंचाचे केंद्रीय सदस्य तथा आमदार भीमराव केराम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे .
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नरेंद्र मोदी यांना सादर केले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की, धर्मांतर आतील झालेल्या नाही आदिवासी प्रवर्गाचा लाभ दिला जातो याबाबत लोकसभा सदस्य तथा केंद्रीय मंत्री स्वर्गीय कार्तिक राव यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे सन 1970 मध्ये विरोध केला होता. उराव यांच्या विरोधाला लोकसभेत 235 खासदार यांनी पाठवा एक स्वाक्षरी केली होती. परंतु यावर अद्याप संशोधन झालेले नाही .त्यामुळे हा प्रस्ताव प्रलंबित आहे सन 1950 ला समाज हिंदू धर्मातील अन्य नागरिकांनी स्वतःचा धर्म सोडून इतर धर्मात धर्मांतर केले त्यांना अनुसूचित जातीचा लाभ दिला जाणार नाही असे संशोधनातून मान्य झाले होते. ज्या नागरिकांनी स्वतःचा धर्म सोडून इतर धर्म स्वीकारले आहेत अशा नागरिक व त्यांच्या परिवारातील सदस्यांना अनुसूचित जमातीचा लाभ नियमबाह्य असल्याचे निवेदनात म्हटले आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी.अशी मागणी जनजाती कल्यांचे जिल्हा सचिव प्रकाश टारपे ,जनजाती हित सुरक्षा मंच पश्चिम क्षेत्राचे गोवर्धन मुंडे ,जनजाती कल्याण जिल्हा सचिव प्रकाश तुकाराम पेंदोर,नगराध्यक्ष आनंद मच्चेवार ,कपिल कांबळे, संतोष मरस्कोल्हे ,ज्ञानेश्वर जेवलेवाड,प्रेमदास मेश्राम आदी उपस्थिती होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply