kinwat today news

आ.भीमराव केराम यांच्या कडुन बेहेरे कुटुंबाचे सांत्वन.

माहूर प्रतिनिधी- किनवट विधानसभा मतदारसंघातचे आमदार  भीमराव केराम यांनी दि.२८ ऑक्टो.रोजी सायं. ७ वाजता वाई बाजार येथील प्रतिष्ठीत व्यक्ती कै.शंकरराव बेहेरे यांचे निवासस्थानी भेट देवून त्यांचे चिरंजीव पञकार कार्तिक बेहेरे यांचेसह त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. 

कै.शंकरराव बेहेरे यांनी उभे आयुष्य वाई बाजार व परिसरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचा व साहित्याचा प्रचार/प्रसार केला होता. नुकतेच त्यांचे निधन झाले होते.यावेळी आ.केराम यांचे समवेत धरमसिंग राठोड, अनिल तिरमनवार, गोपु महामुने,विष्णु पडलवार,प्रकाश कुड़मते, नीलकंठ कातले,शे. इब्राहीम,सुभाष सारखनीकर,देवराव कुड़मते,संतोष मरसकोल्हे ,मनोज कन्नलवार, प्रशांत शिंदे,मारोती खराटे,वसंत साठे यांचेसह अनेकांची  उपस्थिती होती.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply