kinwat today news

मुंगशी गावचे भूमिपुत्र मुरलीधर राठोड ; किनवट पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजु ; मुंगशी ग्रामस्थांनी केला सत्कार

किनवट/प्रतिनिधी : आई रेणुका देवी, भगवान दत्तप्रभू मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या मोजे मुंगशी गावचे भूमिपुत्र मुरलीधर राठोड हे किनवट पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून नुकतेच रुजु झाल्यानंतर मुंगशी ग्रामस्थांनी आज त्यांच्या सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
माहूर तालुक्यातील मौजे मुगशीया गावचे मूळ रहिवासी असलेले मुरलीधर दुधराम राठोड हे पोलीस विभागात कार्यरत असून किनवट पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक म्हणून नुकतेच रुजू झाले आहेत. दरम्यान किनवट पोलीस ठाण्यात रुजु झाल्याचे कळाल्या नंतर आज मुंगशी ग्रामस्थांनी त्यांची भेट घेतली तसेच पोलिस उपनिरीक्षक मुरलीधर राठोड यांचा मुंगशी ग्रामस्थांच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला. यापूर्वी मुखेड येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल या पदावर सेवा बजावल्यानंतर मुरलीधर राठोड हे पदोन्नती मुळे पोलीस उपनिरीक्षक म्हणून किनवट येथे रुजू झाले आहेत.
आपल्या मातृभूमीत शासकीय सेवा करण्याची संधी प्राप्त झाल्याचा आनंद तर वाटतच आहे परंतु उपविभागीय पोलिस अधिकारी मदार नाईक व पोलीस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे मोडीत काढून कायदा व सुव्यवस्था कायम टिकून ठेवण्यासाठी चोखपणे कर्तव्य बजावेल असे मत पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर राठोड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
याप्रसंगी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधव यांच्यासह मुंगशी येथील सामाजिक कार्यकर्ते देविदास राठोड, ग्रामपंचायत सदस्य रोहिदास जानु जाधव, तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा दैनिक गाववालाचे तालुका प्रतिनिधी दुर्गादास राठोड, माजी सरपंच श्रीकांत राठोड,शेकोराव तिळेवाड, शिवराम राठोड, माजी ग्रामपंचायत सदस्य थावरा राठोड आदींची उपस्थिती होती.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply