kinwat today news

भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या नांदेड जिल्हाअध्यक्ष पदी किनवट येथील सिनेअभिनेते लक्ष्मीकांत मुंडे यांची नियुक्ती.

किनवट प्रतिनिधी: दिनांक 27 अक्टो. 2019 रोजी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीत भाजपा चित्रपट कामगार आघाडीची निवड करण्यात आली.
भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या नांदेड जिल्हाअध्यक्ष पदी किनवट येथील सिनेअभिनेते लक्ष्मीकांत मुंडे यांची एक वर्षासाठी नियुक्ती गणेशजी ताठे अध्यक्ष- महाराष्ट्र प्रदेश कामगार आघाडी, विजय सरोज प्रदेशाध्यक्ष भाजपा चित्रपट कामगार आघाडी, श्री सत्यवान गावडे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश चित्रपट कामगार आघाडी यांच्या सहीने करण्यात आली.
चित्रपट कामगार चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री चंद्रकांत दादा पाटील ,महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते श्री देवेंद्रजी फडणवीस, कामगार नेते माननीय श्री संजय केनेकर, कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेशजी ताठे, तसेच भाजपा चित्रपट कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री विजय जी सरोज यांना अभिप्रेत असणारी भाजपा चित्रपट कामगार आघाडी ची ध्येय,धोरणे कामगार कलाकारांच्या समस्या, व संघटने’ने दिलेले कार्यक्रम कामगाराच्या शाश्वत विकासासाठी राबवून देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये चित्रपटातील कामगार वर्गाचे स्थान अधोरेखित करण्याची जबाबदारी सोपविण्यातआली आहे. चित्रपट सृष्टीतील कामगार, कलाकार ,तंत्रज्ञ आणि इतर घटकांच्या विकासासाठी न्यायासाठी आपण बांधील राहील अशा प्रकारची अपेक्षा नियुक्ती करणारे प्रदेशाध्यक्ष यांनी केली आहे. तसेच त्यांच्या नियुक्तीबद्दल आणि पुढील वाटचाली बद्दल त्यांना शुभेच्छाही नियुक्ती पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल नांदेड जिल्ह्यातील चित्रपट सृष्टतील सर्व मित्र मंडळी कडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
किनवट टुडे न्युज नेटवर्क चे संपादक आनंद भालेराव यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply