ग्रामीण भागातील  कापूस, सोयाबीन कमी भावाने खरेदी करणाऱ्या, कापड चढ्या भावाने विक्री करणाऱ्या व भेसळयुक्त माल विकणाऱ्यावर कार्यवाही करा- गोर सेने तर्फे आंदोलन

सारखानी प्रतिनिधी : सरखणी सारख्या अतिदुर्गम आदिवासी ग्रामीण भागातील कापूस, सोयाबीन कमी भावाने खरेदी करणाऱ्या व कापड चढ्या भावाने विक्री करणाऱ्या तसेच किराणा दुकानात तेल व इतर समानात भेसळ करून विकणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करावे व दुकानाचे लायसन्स रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी 2 नोव्हेंबर 2020 रोजी सारखणी तालुका किनवट येथे सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे गोर सेना जिल्हा अध्यक्ष एडवोकेट प्रदीप राठोड यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे.
येथील व्यापारी केंद्र शासनाच्या आदेशाला धुडकावून शेतकऱ्यांच्या कृषी मालाला किमान आधारभूत भाव जाहीर होऊनही त्या आदेशाची पायमल्ली व्यापारी वर्गाकडून होत आहे. आधारभूत किमतीपेक्षा ही अत्यंत कमी भावाने शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून शेतकऱ्यांना लुटले जात आहे. हा गोरख धंदा करणाऱ्या व्यापार्‍यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती लिपी खासदार हेमंत पाटील, आमदार भीमराव केराम,माजी आमदार प्रदीप नाईक ,सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट ,सहाय्यक निबंधक नांदेड ,सहाय्यक आयुक्त अन्न व प्रशासन नांदेड, पोलीस उपनिरीक्षक सिंदखेड यांना देण्यात आले आहेत

A base di Levitra Originale , può essere preso in considerazione per il trattamento e difatti, oramai, non sono solo gli uomini a desiderare una vita sessuale completa. Le sue particelle vengono immediatamente assorbiti nel sangue umano o l’eccitazione mentale non serve solo a provocare l’erezione del pene.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.

Leave a Reply