kinwat today news

किनवट 22 आक्टो. रोजी मध्ये 2 बाधितांची भर

किनवट / प्रतिनिधी :गुरुवार ता.22 ऑक्टोंबर 2020 रोजी रात्री 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार तालुक्यातील 2
बाधितांची भर एँटिजेन तपासणीद्वारे पडली.

त्यामुळे आता बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 562 झाली आहे. आजपर्यंत 483 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. आजचा 2 बाधित हे किनवट शहरातील रुग्ण आहे.
बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 7, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 9 व होम क्वारंटाईन 12 अशा एकूण 28 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

ता.20 ऑक्टो रोजी 293 ऍन्टिजेन टेस्ट पैकी 3 व ता. 21 ऑक्टो रोजी आरटीपीआर टेस्ट द्वारे 2 आणि 15 एन्टिजेन टेस्ट पैकी 3 असे 5 बाधित आढळले होते.

किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
ता.22/10/2020 रात्री 6 वाजता

आरटीपीसीआर टेस्ट
आजपर्यंत घेतलेले एकूण स्वॅब- 752,
आजपर्यंतचे निगेटिव्ह स्वॅब-629,
आज घेतलेले स्वॅब – 5,
आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-0,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या – 0,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,

ऍन्टिजेन टेस्ट
ऍन्टिजन टेस्ट- 23,
आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या-2,
निगेटिव्ह अहवाल-21,

आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण-2,

आज मृत्यू – 0,
आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-15,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -562,
आज सुटी दिलेले -2,
रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-483,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-16 (12 होम क्वारंटाईन)

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply