अवैध वृक्षतोड करत असताना  सागवान  49 नग जप्त ;आरोपी पसार.

बोधडी प्रतिनिधी: आज दिनांक 22/10/2020 रोजी जंगल गस्त करीत असतांना 7:45 AM वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्र – बोधडी अंतर्गत लींग्दरी बिटामधे चिकली येथील कुख्यात वन तस्कर 20 ते 25 च्या टोळीने येऊन जंगलामध्ये अवैध वृक्षतोड करत असताना दिसून आले सागवान नग (49) जप्त करण्यात आले सदर अरोपी जंगलाचा फायदा घेऊन पसार झाले.

सदर कार्यवाही मा. श्री. सातेलीकर साहेब उप वनसवरक्षक नांदेड़ , मा. श्री . पवार साहेब सहायक वन सवरक्षक नांदेड़ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेञ अधिकारी एस यू जाधव,वनपरिमंडळ अधिकारी बी.टी. जाधव साहेब. वनरक्षक – व्ही.बी. बोर्डे टी. एस.तोटावड जी. एस.देवकांबळे वनमजूर कांबळे व ड्रायवर बालाजी राठोड यांनी केली तर वन गुन्हा वनपाल पाटोदा यांनी नोंद केला.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.