kinwat today news

उपविभागीय विज वितरण कार्यालय किनवट समोर उदया 22 आक्टो. रोजी हसन शेख उस्मान यांच्या कुटूंबियांकडून आमरण उपोषण.

किनवट प्रतिनिधी: घरावरून जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वायरास हात लागुन जखमी हसन शेख उस्मान याचा अखेर दिनांक 14 ऑक्टोबर 2020 रोजी सायं 7:00 वा जे.जे.हाॅसपीटल येथे मृत्यू झाला. त्याचा पि.एम.दिनांक 15ऑक्टोबर 2020 ला करण्यात आला नंतर त्यांच्यावर किनवट येथे दिनांक 16 ऑक्टोबर सकाळी 9:00 वा अंतिम संस्कार करण्यात आला, त्यांच्या पश्चात हसन याला 5 वर्षांचा मुलगा आहे.


google.com, pub-6923004089492120, DIRECT, f08c47fec0942fa0

त्यांना आतापर्यंत शासना कडून व विज वितरण कंपनी कडून कसलीच मदत मिळाली नाही.त्यामुळे दिनांक 22 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11:00 वा. त्याचे आई-वडिल, आत्या आणि कुटुंब हे उप- अभियंता व विज वितरण कार्यालयाच्या कर्मचारी यांच्या विरोधात “आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply