kinwat today news

अंबाडीच्या सरपंचपदी वंदना किशन गेडाम यांची बिनविरोध निवड

किनवट/ प्रतिनिधी:किनवट तालुक्यातील अंबाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वंदना किशन गेडाम यांची बिनविरोध निवड झाली आहे.
थेट जनतेतुन निवडुन आलेल्या सरपंचानी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना यापुर्वीच बडतर्फ केल्याने नऊ महिन्यानंतर अंबाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणुक आज पार पडली नऊ सदस्यीय ग्रामपंचायत सरपंच निवडीच्या वेळी एक ग्रा.प.सदस्य अनुपस्थीत होता . आठ सदस्य उपस्थित होते ग्राम पंचायतीच्या सभागृहात सरपंच पदाच्या निवड प्रकीयेला सुरवात झाल्यानंतर सरपंच पदासाठी केवळ वंदना गेडाम यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणुक बिनविरोध पार पडली .

पिठासीन अधिकारी म्हणुन नायाब तहसीलदार सर्वैश मेश्राम यांनी काम पाहीले सहाय्य मंडळ अधिकारी पी.व्ही. बुरकुले , तलाठी नारमवाड आदींनी सहकार्य केले .

नुतन सरपंच वंदना गेडाम यांचा हिगोंली लोकसभेचे खासदार व किनवर- माहुर विधान सभेचे आमदार भीमराव केराम यांनी बिनविरोध निवडी बद्दल सुशिक्षित युवा नुतन सरपंच वंदना गेडाम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला या निवडीने गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे .

google.com, pub-6923004089492120, DIRECT, f08c47fec0942fa0

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply