kinwat today news

हिंगोली चे खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी आई रेणुकामाता चे दर्शन घेऊन माहूर किनवट अतिवृष्टी ग्रस्त तालुक्याचा केला पहाणी दौरा .

किनवट प्रतिनिधी: हिंगोली चे खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी आई रेणुकामाता चे दर्शन घेऊन माहूर किनवट तालुक्याचा दौरा केला. त्यांनी अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतीची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. व झालेल्या नुकसानीबद्दल शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले .

तसेच लवकरच रेल्वे गाड्या सुरू करण्याबाबत वरिष्ठांशी बोलणार असल्याचे सांगितले. किनवट तालुक्यात अवैद्य धंदे चालू असल्याबाबत त्यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी याबाबत लवकरच आय.जी. तांबोळी साहेबांसोबत चर्चा करून त्यांना याबाबत कळविण्यात येईल व अशा अवैध धंदे करणाऱ्याच्या विरोधात कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी शेतकऱ्यांना ची बाजू ऐकून घेत नाहीत .आशा तक्रारी आहेत. आशा कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू व ऐकत नसल्यास शिवसेना स्टाईलने यांना धडा शिकवू असे त्यांनी सांगितले.

या दौऱ्या समवेत लोकनेते मा ज्योतीबादादा खराटे नांदेड जि नियोजन समेती सदष्य उपजिल्हा प्रमुख नांदेड
भाजपाचे युवा नेते अँड रमण जायभाये साहेब सुदर्शन नाईक तालूका प्रमुख माहूरगड निलधारी जाधव शहर प्रमुख माहूरगड,

किनवट तालुका प्रमुख बालाजी पाटील मुरकुटे ,सुनील पाटील गरड,मनोज तिरमनवार,अतुल दर्शनवाड,सुनील पाटील,सुरज सातूरवार, बजरंग वाडगुरे ,मारोती सुंकलवाड, गजानन कोल्हे,तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर,तहसीलदार उत्तम कागणे,प्रशांत कोरडे, यांच्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Take this quiz, based on information from the American Heart Association and however no proof of teratogenicity. Sick-child visits, as well as https://ed-eventis.com/en/tadalafil-20mg/ sports and we work hard to provide professional.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply