kinwat today news

किनवटमध्ये 19 ऑक्टोबर रोजी 2 कोरोना बाधितास औषधोपचारानंतर सुटी, 1 बाधिताची भर

किनवट / प्रतिनिधी : सोमवार 19 ऑक्टोंबर 2020 रोजी रात्री 23.27 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार तालुक्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी दिली तर 1 बाधिताची भर एँटिजेन तपासणीद्वारे पडली.

त्यामुळे आता बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 552 झाली आहे. आजपर्यंत 483 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. आजचा 1 बाधित हा बोधडी (बु) येथील रुग्ण आहे.
बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 5, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 10 व होम क्वारंटाईन 13 अशा एकूण 28 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
ता.19/10/2020 रात्री 23. 27 वाजता

आरटीपीसीआर टेस्ट
आजपर्यंत घेतलेले एकूण स्वॅब- 730,
आजपर्यंतचे निगेटिव्ह स्वॅब-607,
आज घेतलेले स्वॅब – 0,
आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-0,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या – 0,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,

ऍन्टिजेन टेस्ट
ऍन्टिजन टेस्ट- 42,
आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या- 1,
निगेटिव्ह अहवाल- 41,

आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण-1,

आज मृत्यू – 0,
आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-15,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -552,
आज सुटी दिलेले -2,
रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-483,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-15 (13 होम क्वारंटाईन)

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply