kinwat today news

पंचनाम्याची सोंगे बंद करा-संभाजी ब्रिगेड; नांदेड-लातुर महामार्गावर संभाजी ब्रिगेडचा रास्ता रोको

नांदेड: बालाजी सिरसाट/ पंचनाम्याची सोंगे बंद करुन सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा व मराठा समाजाचा ओबिसीत समावेश करावा या व इतर मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्यावतीने नांदेड ते लातुर महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

संभाजी ब्रिगेड नांदेड दक्षिण तालुक्याच्यावतीने करण्यात आले ले रास्ता रोको आंदोलन पंनाम्याची सोंगे बंद करुन सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५०,०००रूपये नुकसान भरपाई द्यावी,मराठा समाजाचा ओबिसीत समावेश करुन आरक्षणाचा प्रश्न लवकर मिटवावा,पिकविमा मंजुर करावा,कर्जमाफी झालेल्या शेतकर्यांच्या याद्या लवकरात लवकर प्रसिद्ध करुन तात्काळ त्यांना पिककर्ज द्यावे,राष्टीय महामार्ग ३६१ वरील नांदेड ते लातुर मार्गावरील सर्व खड्डे बुजवुन कायमस्वरुपी तात्आळ रस्ता दुरुस्त करावा,उत्तरप्रदेशातील हाथरस येथील बलात्कार्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागण्यांसाठी होते.सन २०२०-२०२१ मधील लोकसभेतील शेतकरी विरोधी कृषीविधेयक तात्काळ रद्द करुन स्वामिनाथन आयोग लागु करावा या मागण्यांसाठी हा रास्ता रोको करण्यात आला.

निसर्गाने शेतकर्यांकडे पाठ फिरवली मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याकारणाने शेतकर्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले असतांना पंचनाम्याची सोंगे शासन का करत आहे,सत्ताधार्यांना आपण विरोधी पक्षात आहोत असे वाटते काय ते गावोगाव जाऊन ओला दुष्काळ दौरे करत आहेत.शेतकर्यांची तुम्हाला तळमळ असेल तर शरद पवारांनी व इतर महाराष्ट्र सरकारमधील मंञ्यांनी ओला दुष्काळाचे पॅकेज घेऊनच नांदेड जिल्ह्यात पाऊल ठेवावे.शासनाने जलद गतीने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांना हेक्टरी ५०,०००रूपये नुकसानभरपाई द्यावी असे लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांनी मत मांडले,पिककर्ज माफ केले म्हणुन शासनाने पिककर्जाएवढे पैसे कर्जमाफीच्या जाहिरातीत घाटले पण आणखी काय कर्जमाफीच्या याद्याच पुर्ण आल्या नाहीत काही शेतकर्याचे माफ झाले तर काहीचे झाले नाही सरसकट पिककर्ज माफ करून नविन पिककर्ज लवकर द्यावे,तसेच पिकविमाही मंजुर करावा असे मत जिल्हाध्यक्ष शाम पाटील यांनी व्यक्त केले,

मराठा समाजाचा ओबिसीत समावेश केला तरच आरक्षण टिकु शकते सध्या ओबिसीत असलेल्या बांधवाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देता येते त्याप्रमाणे द्यावे असे मत जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांनी मत व्यक्त केले.एका राञीत ३७० कलम रद्द होवु शकते,राम मंदीर बांधल्याजाऊ शकते तर बलात्कार्यांना फाशी देण्याचे कलम लागु करायला वेळ का लागत आहे असे मत इंजि. प्रविण जाधव यांनी मत व्यक्त केले ते पुढे म्हणाले उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील मुलीवर झालेल्या बलातकार्यांना फाशीची शीक्षा द्यावी का तिचा अंतिमसंस्कार राञीच्या अंधारात कुटुंबांच्या अनुपस्थित का केला असा सवालही त्यांनी व्यक्त केले राष्ट्रीय महामार्ग ३६१वरील खड्डे कायमस्वरूपी बुजविण्यात यावेत असे मत रास्ता रोकोचे आयोजक तथा नांदेड दक्षिण तालुकाध्यक्षद त्ता येवले यांनी आपले मत व्यक्त केले.

धर्मवीर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोरे यांनी उपस्थित राहुन पाठिंबा दिला.अंकुश कोल्हे सर्वांचे आभार मांडले.जय जिजाऊ जय शिवराय,मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे,ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे,हाथरस येथील बलाताकार्यांना फिशी झाली पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणुन गेला होता.यावेळी दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.प्रचंड पोलिस बदोबस्तही या रास्तारोको साठी होता.यावेळी संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील,जिल्हाध्यक्ष शाम पाटील,जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे,शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष कृष्णा मोरे,विधानसभा अध्यक्ष दिपक भरकड,तालुकाध्यक्ष दत्ता येवले,राम अन्नकाडे,शंकर घोरबांड लोहा विधानसभा अध्यक्ष माधव घोरबांड,प्रविण जाधव,गजानन पवार,आंकुश कोल्हे ,सुदर्शन कदम,ज्ञानेश्वर शिंदे,दशरथ डरंगे,माधव पवार,गोविंद मोरे,राजु कळके,गणेश भोसले,पांडुरंग क्षीरसागर,सुनील मंदावाड,हनुमान लामदाडे,जेजेराव शिंदे,शिवराम काळे,विश्वनाथ पवार,कैलास पुंड,आजय हिवंत,पवन कदम यांच्यासह हजारो शेतकरी समाजबांधव उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply