kinwat today news

किनवटमध्ये आज 1 कोरोना बाधितास औषधोपचारानंतर सुटी, 1 बाधिताची भर

किनवट / प्रतिनिधी : रविवार 18 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार तालुक्यातील 1 कोरोना बाधितास औषधोपचारानंतर सुटी दिली तर 1 बाधिताची भर एँटिजेन तपासणीद्वारे पडली. 


त्यामुळे आता बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 551 झाली आहे. आजपर्यंत 481 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. आजचा 1 बाधित हा गोकुंदा येथील रुग्ण आहे.
बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 6, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 9 व होम क्वारंटाईन 15 अशा एकूण 30 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
ता.18/10/2020 सायंकाळी 06.00 वाजता

आरटीपीसीआर टेस्ट
आजपर्यंत घेतलेले एकूण स्वॅब- 730,
आजपर्यंतचे निगेटिव्ह स्वॅब-607,
आज घेतलेले स्वॅब – 0,
आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-0,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या – 0,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,

ऍन्टिजेन टेस्ट
ऍन्टिजन टेस्ट-2,
आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या- 1,
निगेटिव्ह अहवाल-1,

आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण-1,

आज मृत्यू – 0,
आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-15,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -551,
आज सुटी दिलेले -1,
रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-481,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-15 (15 होम क्वारंटाईन)

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply