kinwat today news

किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड येथील मनमोहक धबधबा आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

किनवट प्रतिनिधी: किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड येथील मनमोहक धबधबा आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्हा व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर हा धबधबा स्थित आहे. सदरील धबधबा पाण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा राज्यातील अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत.या धबधब्या लागताच एक सुंदर प्रकारची बाग तयार करण्यात आली असुन लहान मुलांना खेळण्यासाठी सर्व प्रकारची खेळणी बसविण्यात आले आहे. या ठिकाणी प्राचीन महादेवाचे मंदीर आहे.

तसेच राहण्यासाठी रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. हा धबधबा पहाण्यासाठी पैनगंगेत पूल तयार करण्यात आला आहे. या ठिकाणाहून धबधब्याचे विहंगमय दृश्य पहावयास मिळते.या ठिकाणी भेट देण्यासाठी नांदेड किनवट रेल्वे मार्गाने सहस्त्रकुंड येथे उतरावे लागते. किनवट वरून 50 किमी तर नांदेड वरून 100 किमी अंतर आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply