kinwat today news

किनवट मध्ये 17 ऑक्टोबर रोजी 2 बाधितांची भर

 

  • किनवट / तालुका प्रतिनिधी : शनिवार 17 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार तालुक्यातील 2 व्यक्ती आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित आढळले. 


त्यामुळे आता बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 550 झाली आहे. आजपर्यंत 480 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांपैकी प्रधानसांगवी 1 व गोकुंदा 1 असे एकूण 2 रुग्ण आहेत.
बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 8, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 8 व होम क्वारंटाईन 15 अशा एकूण 31 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.
शुक्रवार दि. 16 ऑक्टोबर रोजी 4 कोरोना बाधितास औषधोपचारानंतर सुटी दिली. तर किनवट शहरातील 1 व गोकुंदा येथील 1 अशा 2 व्यक्तींचा अहवाल ऍटिजेन तपासणीत बाधित आला होता.

किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
ता. 17/10/2020 सायंकाळी 06.00 वाजता

आरटीपीसीआर टेस्ट
आजपर्यंत घेतलेले एकूण स्वॅब- 730,
आजपर्यंतचे निगेटिव्ह स्वॅब-607,
आज घेतलेले स्वॅब – 0,
आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-2,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या – 0,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,

ऍन्टिजेन टेस्ट
ऍन्टिजन टेस्ट-12,
आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या-0,
निगेटिव्ह अहवाल-12,

आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण-2,

आज मृत्यू – 0,
आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-15,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -550,
आज सुटी दिलेले -0,
रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-480,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-16 (15 होम क्वारंटाईन)

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply