kinwat today news

अखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य च्या किनवट तालुका अध्यक्षपदी आंधबोरीचे अशोकराव जळबाराव सूर्यवंशी महाराज यांची निवड

किनवट प्रतिनिधी: अखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य च्या किनवट तालुका अध्यक्षपदी आंधबोरीचे सर्व परिचित असलेले अशोकराव जळबाराव सूर्यवंशी महाराज यांची पुढील पाच वर्षासाठी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नितीन सातपुते मराठवाडा संघटक माधवराव सावंत जिल्हाध्यक्ष दिगंबरराव कदम यांच्या स्वाक्षरीने निवड करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच समाज प्रबोधनातून सकाळ जनाचे कल्याण ही परिषदेची विचारधारा आहे.

या विचारधारेला अनुसरूनच आपल्या आजवरच्या कार्याची वाटचाल सुरू आहे आपल्या हातून हे कार्य भविष्यात आणखी जोमाने होईल अशा दृढ विश्वासातून आपले वरील वरील पदावर नियुक्ती करण्यात आली आहे आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा अशा प्रकारचे नियुक्ती पत्र अंदोरी पोलीस पाटील अशोकराव सूर्यवंशी यांना देण्यात आलेली आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे तसेच अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे

अखिल विश्व वारकरी परिषद तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली आहे. किनवट तालुका अध्यक्षपदी अशोकराव जळबाराव सूर्यवंशी आंदबोरी ,उपाध्यक्ष -केशवराव कराड,कार्यकारी अध्यक्ष- आत्माराम मुंडे वंजारवाडी, कार्याध्यक्ष- अशोकराव शेलार दरसांगवी, ,सचिव-कैलास बाभूळकर मलकवाडी,सहसचिव-गणेश कोरडे दहेगाव सल्लागार राजाराम गंगाराम शिरपुरे पाटोदा, तालुका संघटक सुधाकर कदम सिंगारवाडी तालुकाप्रमुख वेंकट पांचाळ सावरगाव तांडा, तालुका प्रसिद्धीप्रमुख दिगंबर गारोळे सिंगारवाडी, सरचिटणीस किसन चिरंगे मोहपूर, प्रवक्ता दिगंबर मुंडे प्रधानसांगवी, कोषाध्यक्ष नागनाथ आंधळे अंदबोरी, सदस्य- मोहन धजाळे बुधवरपेठ, विश्वनाथ कनाके मलकवाडी, कैलास जाधव दहेगाव,सुनील कराळे पाटोदा,दत्ता सुरोसे दरसांगवी,वैजनाथ शिंदे पारडी,शंकर सलगर दहेगाव , ज्ञानेश्वर पुरबजी सुयर्यवंशी कमठाला,सिद्धेश्वर दराडे सावरी आदी.ची निवड करण्यात आली.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply