kinwat today news

जलधारा प्रा.आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात याव्यात – रामदास अंबादास पवार

बेल्लोरी धानोरा (प्रतिनिधी) कोरोनाची साथ सुरू झाल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र जलधरा या सरकारी दवाखान्यात कुटुंब कल्याण श्त्रक्रिया बंद आहेत. त्या शत्र्यक्रिया तात्काळ सुरू करण्यात याव्यात अशी मागणी दिग्रस येथील ग्रामकोष समितीचे अध्यक्ष रामदास अंबादास पवार यांनी सहायक जील्ह्याधिकारी किनवट यांच्या कडे मागणी केली आहे.

कोरोणा या महामारी च्या कारणमुळे ईतर सर्व आरोग्य सुविधा बंद पडल्या आहेत. जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या दिग्रस उपकेंद्रात कुटुंब कल्याण शसत्रक्रिया बंद झाल्ामुळे एकाच गावात ६ महिला दोन अपत्य नंतर गरोदर राहिल्या आहेत.या शस्त्र्याक्रिया करायवाच्या असल्यास खाजगी दवाखान्यात 40000 हजार रुपये खर्च येत आहे.ते गरिबाला परवडन्या सारखे नाही. त्यामुळे जनतेची मागणी लक्षात घेऊन तात्काळ या शत्रक्रिया सुरू कराव्यात अशी मागणी रामदास पवार यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कडे निवेनाद्वारे केली आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply