kinwat today news

आपल्या राष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांनी राष्ट्र पुनर्निर्माण करण्यासाठी पुढे आले पाहिजे – डॉ मार्तंड कुलकर्णी

किनवट..आपल्या राष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांनी राष्ट्र पुनर्निर्माण यासाठी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन अ.भा.वि.प. कडून पूर्णवेळ म्हणून जात असलेल्या कार्यकर्त्यांच्या निरोप कार्यक्रम प्रसंगी डॉ मार्तंड कुलकर्णी यांनी केले .अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एकूण किनवट येथे 11 ऑक्टोबर रोजी पूर्णवेळ म्हणून अभाविपच्या कार्यासाठी विस्तारक भूमिकेत जात असलेल्या अजित विवेक केंद्रे यांना निरोप देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अभाविपचे प्रांत संघटनमंत्री नागसेन जी पुंडगे सुनील पाठक डॉ मार्तंड कुलकर्णी चंद्रकांत नेमानी वार हे व अजित केंद्रे हे मंचावर उपस्थित होते प्रारंभी भारत माता पूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला कार्यक्रमाचे प्रस्ताविक शहर अध्यक्ष चंद्रकांत नेमानी वार यांनी केले मान्यवरांचा सत्कार कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कडून सबंध देशभर राष्ट्र निर्माणाचे ..राष्ट्र बांधणीचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे अशा या राष्ट्रीय संघटनेकडून परिषदेचा विस्तार करण्यासाठी हजारो तरुण आपल्या आयुष्यातील महत्त्वाची काही वर्ष देत असतात याच ध्येयाने प्रेरित होऊन किनवट येथील अजित विवेक केंद्रे हा विद्यार्थी पूर्णवेळ विस्तारक म्हणून इचलकरंजी येथे जात आहे त्याला निरोप देण्यासाठी शहरातील विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते एकत्रित झाले होते यावेळी निरोप प्रसंगी मार्गदर्शन करण्यासाठी डॉ मार्तंड कुलकर्णी .सुनील पाठक. नागेश नजी पुंडगे ..बजरंग चौधरी यांनी विचार व्यक्त केले निरोपाला उत्तर देताना अजित केंद्र यांनी आपण पूर्णवेळ म्हणून का जात आहोत याविषयी मत व्यक्त करत मत व्यक्त करत राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची संधी मला मिळाली आहे त्याचे मी सोनेच करणार असा आशावाद व्यक्त केला प्रारंभी परिषदेचे गीत शुभम कोक लवार यांनी गायलेले तर सूत्रसंचालनआशुतोष बेदरे यांनी केले योगीराज मुंडे यांनी वंदे मातरम सादर केले तर शहर अध्यक्ष चंद्रकांत नेमानी वार यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाला अभाविपचे असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply