kinwat today news

आपले सरकार पोर्टल ने दिव्यांगाची घेतली दखल 2016-2020 पर्यंतचा राखीव निधी वाटप करून प्रकरण निकाली काढण्याचे दिले आदेश

किनवट प्रतिनिधी: किनवट तालुक्यातील दिव्यांग यांची आपले सरकार यांनी दखल घेत किनवटचे गट विकास अधिकारी यांना दिनांक-12/10/2020 रोजी पत्र काढून दिव्यांग लाभार्थ्यांचा सण 2016-2020पर्यंतचा राखीव निधी वाटप करून प्रकरण निकाली काढण्याचे कळविण्यात आले आहे.

अखिल भारतीय अपंग कामगार संघटना किनवट तालुका सचिव यांनी दिनांक 01/10/2020रोजी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्याच्या प्रतीलीपी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या होत्या तसेच आपले सरकार या शासनाच्या पोर्टलवर सुद्धा सदर तक्रार दाखल करण्यात आली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी किनवट यांनी कार्यालयातील सर्व विस्ताराधिकारी यांना व सर्व ग्रामसेवक यांना यापूर्वीच आदेशित करण्यात येऊन दिव्यांगांच्या निधी तात्काळ वाटप करण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु दिव्यांग लाभार्थी व ग्रामसेवक यांचा दररोजचा संपर्क असल्याने विस्ताराधिकारी हे कशाप्रकारे चौकशी करतील याकडे दिव्यांग लाभार्थी व संघटनेचे तालुका सचिव यांचे लक्ष लागले असून प्रकरणात दोषी विरुद्ध कारवाई झाली नसल्यास संघटनेच्यावतीने सदर प्रकरण सक्षम न्यायालयात दाखल करणार असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

आपले सरकार पोर्टल वरील तक्रार व संघटनेच्या वतीने तालुका सचिव यांच्याशी संपर्क साधून प्रकरणात न्याय न मिळाल्यास सक्षम न्यायालयात पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, विस्ताराधिकारी व सर्व ग्रामसेवक यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असे प्रतिनिधी जवळ समक्ष सांगितले असून प्रकरणाकडे सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले असल्याचे शेवटी माहुरकर यांनी सांगितले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply