kinwat today news

किनवटमध्ये काल 7 बाधितांची भर

किनवट / प्रतिनिधी : रविवार 11 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार तालुक्यात 7 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर द्वारे 3 व एँटिजेन किट्स तपासणीद्वारे 4 अहवालाचा समावेश आहे.त्यामुळे आता बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 536 झाली आहे.

आजपर्यंत 468 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. आज किनवट (नागरी भाग ) 3, गोकुंदा 1 व मांडवी 3 अशा एकूण 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 7, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 4 व होम क्वारंटाईन 22 अशा एकूण 33 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
ता. 11/10/2020 सायंकाळी 06.00 वाजता

आरटीपीसीआर टेस्ट
आजपर्यंत घेतलेले एकूण स्वॅब-720,
आजपर्यंतचे निगेटिव्ह स्वॅब-595,
आज घेतलेले स्वॅब-9
आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह संख्या-3,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-9,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-7,

ऍन्टिजेन टेस्ट
ऍन्टिजन टेस्ट-10,
आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या-4,
निगेटिव्ह अहवाल-6,

आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण-7,

आज मृत्यू-0,
आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-15,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती-536,
आज सुटी दिलेले-0,
रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-468,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-11 (22 होम क्वारंटाईन)

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply