kinwat today news

मानवी लोकवस्तीत दुकाने थाटलेल्या फर्निचर मार्ट मध्ये लाकडी साहित्य बनविण्याच्या मशीनीच्या कर्णकर्कश आवाजाला व धुळीला कंटाळून साई नगर भागातील नागरिक आमरण उपोषण करणार

किनवट प्रतिनिधी: मानवी लोकवस्तीत लाकडी फर्निचर दुकान थाटल्याने साई नगर ,खैरोद्दीन मार्ग किनवट या भागातील जनतेचे जगणे अवघड झाले आहे. या दुकानाला लोकवस्तीतून स्थलांतर करण्यासाठी दिनांक ः१६/०१/२०१६ पासून आठ वेळेस विनंती केली आहे. तरीही याला अधिकारी, पदाधिकारी यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यास तयार नाही

नगरपालिकेचे अधिकारी ही बाब आमच्या अधिकारात नाही असे सांगत आहेत. आता नागरिकांनी जावे कोणाकडे हा प्रश्न जनतेला पडल्याचे सांगितले जात आहे. या परिसरात आवाजामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही, धूळ व कर्कश आवाजामुळे सामान्य व्यक्ती जीवन जगू शकत नाहीत. यामुळे या दुकानांना दुसरीकडे स्थलांतरीत करावे या मागणी साठी मा.सहाय्यक जिल्हा अधिकारी, किनवट यांच्या कार्यालाया समोर नगराध्यक्ष किनवट, मुख्याधिकारी श्री निलेश सुंकलवार नगरपालीका किनवट, वनपरिक्षेत्र अधिकारी किशन खंदारे, अवसायक खरेदी विक्री संघ पि.जी.पपूलवाड यांच्या विरोधात आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात कळविले आहे.
या निवेदनात खालील साई नगर रहिवाशी यांच्या सह्या आहेत. अर्जुन किशन आडे,आत्माराम मुंडे, मोहन जाधव,प्रकाश रंगनेनवार, यु.बी.चव्हाण,महेंद्र कांबळे, अर्चना रंगनेनवार, शैलीया आडे,लताताई जाधव, सुमन चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत..

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply